सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस तमिळनाडूच्या दौऱ्यावर आहे. यादरम्यान, पंतप्रधानांनी तमिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील श्री रंगनाथस्वामी मंदिरात पूजा केली. या मंदिरात पूजा करणारे ते पहिलेच पंतप्रधान आहेत.

PM Modi Tamil Nadu Visit : अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा (Ram Mandir Pran Prathistha) सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 22 जानेवारीला पार पडणार आहे. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी देभरात उत्साहाचे वातावरण आहे. सध्या पंतप्रधान दोन दिवसांच्या तमिळनाडू दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तमिळनाडूमधील तिरुचिरापल्ली (Tiruchirappalli) येथील श्री रंगनाथस्वामी मंदिरात (Ranganathaswamy Temple) पूजा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्री रंगनाथस्वामी मंदिरात प्रवेश केल्यानंतर हत्तीने त्यांना आशीर्वाद दिला. याशिवाय हत्तीने पंतप्रधानांसमोर माउथ ऑर्गनही (Mouth Organ) वाजवून दाखवले. यानंतर पंतप्रधानांनी मंदिरात पूजा-प्रार्थना केली. श्री रंगनाथस्वामी मंदिरात पूजा करणारे ते पहिलेच पंतप्रधान आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तमिळनाडूतील महत्त्वाच्या मंदिरांना भेट देत पूजा करणार आहेत. याशिवाय दुपारी 2 वाजता रामेश्वर येथे जाणार आहेत. येथे श्री अरुलमिगु रामनाथस्वामी मंदिरात दर्शन घेण्यासह पूजा करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दोन दिवस तमिळनाडू दौरा
गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान देशातील मंदिरांना भेट देत तेथे पूजा-प्रार्थना करत आहेत. यादरम्यान पंतप्रधान 11 दिवसांच्या विशेष अनुष्ठानचेही पालन करत आहेत. रविवारी (21 जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी धनुषकोडी येथील कोठंडारास्वामी मंदिरात पूजा-दर्शन करणार आहेत. याशिवाय राम सेतू ज्या ठिकाणी बांधण्यात आलाय तेथेही पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहेत.

यानंतर दुपारी रामेश्वरमसाठी पंतप्रधान निघणार आहेत. रामेश्वममध्ये पवित्र स्नान केल्यानंतर 22 तीर्थांचा दौरा करणार आहेत. याशिवाय रामायणाबद्दल आठ राज्यांतील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही ते सहभागी होणार आहे. दिल्लीला रवाना होण्याआधी पंतप्रधान कोठंडारास्वामी मंदिरात जाणार आहेत.

अयोध्येत रामललांची मूर्ती दाखल
अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेआधीच 16 जानेवारीपासून मंदिरात धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे. 19 जानेवारीला रामललांची मूर्ती गाभाऱ्यात स्थापन करण्यात आली. यानंतर सोशल मीडियावर रामललांच्या मूर्तीचे फोटो व्हायरल झाले आहेत. आता सर्वजण रामललांच्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. याशिवाय देशातील काही राज्यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेवेळी सुट्टी जाहीर केली आहे.

आणखी वाचा : 

Ram Mandir Pran Pratishtha : पंतप्रधान मोदींचे 11 दिवसांचे अनुष्ठान, सर्व विधींचे काटेकोरपणे करताहेत पालन

20 किलो Parle G बिस्किटांचा वापर करुन साकारण्यात आलेय राम मंदिर, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Odisha : जगन्नाथ पुरी हेरिटेज कॉरिडॉरचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केले उद्घाटन, 800 कोटी रूपयांचा खर्च करून बांधण्यात आलाय प्रकल्प