सार
पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीरमधील श्रीनगर येथे दौरा करणार आहेत. याशिवाय श्रीनगरमध्ये एका सार्वजनिक सभेलाही पंतप्रधान संबोधित करणार आहेत.
PM Narendra Modi Kashmir Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (7 मार्च) काश्मीरचा दौरा करणार आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी कलम 370 हटविल्यानंकर काश्मीरच्या धरतीवर पाऊल ठेवणार आहेत. यानिमित्त पंतप्रधान काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये एका सार्वजनिक सभेला संबोधित करणार आहेत. सभेआधी पंतप्रधान श्रीनगर येथे 6400 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन श्रीनगरधील बख्शी स्टेडिअममध्ये केले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या श्रीनगरमधील कार्यक्रमासाठी कठोर सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. काश्मीरमधील पक्षाच्या युनिटचे अध्यक्ष रवेंद्र रैना यांनी म्हटले की, रॅलीमध्ये दोन लाखांच्या आसपास नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे. याशिवाय कार्यक्रमाला ऐतिहासिक रुप देण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांना तैनात करण्यात आले आहेत.
भाजप पक्षाला पंतप्रधान मोदींच्या श्रीनगरमधील काश्मीर दौऱ्यासंदर्भात काही अपेक्षा आहेत. याशिवाय पंतप्रधानांच्या काश्मीर दौऱ्यामुळे मुस्लिम बहुल काश्मीरमध्ये पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीत मजबूती मिळेल. यावर भाजपमधील राज्याचे प्रवक्ता अल्ताफ ठाकुर यांनी म्हटले की, आमच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती आमच्या कार्यकर्त्यांसाठी एक मोठे प्रोत्साहन आहे.
काश्मीरमध्ये मुस्लीम तीर्थक्षेत्राचेही उद्घाटन करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काश्मीर दौऱ्याआधी राज्याच्या माजी राजकीय कार्यकर्ता शेहला रशीद यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहिले की, पंतप्रधांनांच्या श्रीनगरचा दौरा करणार आहेत. याशिवाय श्रीनगरमधील सर्वाधिक प्रतिष्ठित मुस्लीम तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या एक हजरतबलसंबंधित विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. याशिवाय राज्यातील विरोधी पक्ष जसे की, नॅशनल कॉन्फ्रेंस आणि पीपुल्स डेमोक्रेटिक पार्टीने म्हटले की, पंतप्रधानांचा काश्मीर दौरा खास असल्याचे वाटत नाही.
आणखी वाचा :