सार

भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले आहे. या मेट्रोच्या माध्यमातून अवघ्या 45 सेकंदात 20 किलोमीटरचे अंतर पार करता येणार आहे.

India First Underwater Metro :  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी (6 मार्च) कोलकाता  (Kolkata) येथे भारतातील पहिल्याच अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन केले आहे. देशाच्या प्रगती पथावरील हा एक ऐतिहासिक प्रकल्प आहे. याशिवाय पंतप्रधानांनी 15,400 रुपयांच्या काही कनेक्टिव्हिटी प्रकल्पांची पायाभरणी केली. कोलकाता येथील हुगळी नदीजवळ तयार करण्यात आलेला बोगदा हावडा मैदान आणि एस्प्लेनेड यांना जोडण्याचे काम करणार आहे.

हुगळी नदीखालील अंडरवॉटर भुयाराबद्दलच्या खास गोष्टी

  • कोलकता मेट्रोच्या हावडा मैदान-एस्प्लेनेड विभागात हुगळी नदीखाली भारतातील पहिला वाहतूक बोगदा आहे.
  • बोगदा पूर्व-पश्चिम मेट्रोचा हिस्सा आहे. याशिवाय हुगळीच्या पश्चिम तटावर हावडाला पूर्व तटावरील सॉल्ट लेक सिटीशी जोडली जाणार आहे.
  • भारतात पहिल्यांदाच अंडरवॉटर ट्रेन धावणार आहे.
  • अंडर वॉटर मेट्रोचे उद्देश असे आहे की, कोलकातामधील वाढणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवणे.
  • कोलकाता मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KMRCL) च्या मते, 10.8 किलोमीटरचा हिस्सा भूमिगत असणार आहे.
  • हुगळी नदीखालून मेट्रो 520 किलोमीटरचे अंतर केवळ 45 सेंकदात पार पाडणार आहे.

 

भारतातील पहिली मेट्रो कुठे सुरू झाली होती?
भारतातील पहिली आणि आशिया खंडातील पाचवी मेट्रोची सुरूवात कोलकाता येथे झाली होती. याची सुरूवात 40 वर्षांपूर्वी 24 ऑक्टोंबर 1984 रोजी झाली होती. मेट्रो वेबसाइटच्या मते, या मेट्रोने एस्प्लेनेड आणि नेताजी भवनादरम्यान पाच स्थानकांसह 3.40 किमीचा प्रवास केला होता.

पाण्याखाली ट्रेनसाठी बोगदा तयार करण्याचा विचार ब्रिटिश काळातील
बीबीसीच्या रिपोर्ट्सनुसार, पश्चिम बंगालमध्ये जन्मलेले ब्रिटिश इंजिनिअर हार्ले डेलरिम्पल-हे यांनी एका शकताआधी कोलकाता आणि हावडाला जोडणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी 10.6 किमी अंतर असलेल्या भूमिगत रेल्वेचा विचार केला होता. या योजनेत हुगळी नदीखाली एक बोगदा आणि 10 थांब्यांचा समावेश होता. दरम्यान, पैशांचे आव्हान आणि शहराच्या रुपरेषेमुळे ही योजना कधीच पूर्ण झाली नाही.

यानंतर वर्ष 1928 मध्ये शहराला वीज पुरवठा करणारी कंपनी सीईएससीने वीज केबलसाठी हुगळी नदीखाली बोगदा तयार करण्यासाठी हार्ले यांना संपर्क केला होता. त्यांनी आव्हान स्विकारने आणि बोगदा वर्ष 1931 मध्ये कोलकाता येथील पाण्याखाली तयार करण्यात आला.

आणखी वाचा : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचा शुभारंभ, रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला दाखवला झेंडा

लोकसभा निवडणुकीआधी PM मोदींच्या अप्रुवल रेटिंगमुळे विरोधी पक्षात खळबळ, जाणून घ्या आकडेवारी

उत्तर प्रदेशमध्ये योगी मंत्रिमंडळात 4 नवीन मंत्र्यांचा समावेश, ओम प्रकाश राजभर, दारा सिंह चौहान, अनिल कुमार, भाजप आमदार सुनील शर्मा यांनी घेतली शपथ