लोकसभा निवडणुकीआधी PM मोदींच्या अप्रुवल रेटिंगमुळे विरोधी पक्षात खळबळ, जाणून घ्या आकडेवारी

| Published : Mar 06 2024, 12:08 PM IST / Updated: Mar 06 2024, 12:09 PM IST

PM Narendra Modi Speech

सार

नुकत्याच इप्सोस इंडियाबस यांच्याकडून फेब्रुवारी 2024 दरम्यान पंतप्रधान अप्रुव रेटिंग सर्व्हेचा डेटा जारी केला आहे. नव्या डेटानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अप्रुवल रेटिंगमध्ये 75 टक्के मिळाले आहेत.

PM Modi Approval Rating : देशात लवकरच आगामी लोकसभा निवडणुका होणार आहेत. अशातच देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाची सर्वत्र चर्चा केली जात असल्याचा पुरावा नुकत्याच एका सर्व्हे मधून समोर आला आहे.

इप्सोस इंडियाबस (Ipsos IndiaBus Survey) यांच्याकडून फेब्रुवारी 2024 दरम्यान पंतप्रधान अप्रुवल रेटिंग सर्व्हेचा डेटा जारी करण्यात आला होता. नव्या डेटानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींना अप्रुवल रेटिंगमध्ये 75 टक्के मिळाले आहेत. खरंतर, गेल्या वर्षातील सप्टेंबर महिन्यातील 65 टक्के अप्रुवल रेटिंगपेक्षा आताच्या रेटिंगमध्ये वाढ झाली आहे.

देशातील नागरिकांना पंतप्रधानांच्या कामामुळे त्यांना 75 टक्के पॉइंट दिले आहेत. काही शहर आणि समूहांनी पंतप्रधानांना त्यांचा कामगिरीसाठी अधिक पॉइंट दिले आहेत. यामध्ये उत्तर भारतातील नागरिकांनी 92 टक्के, पूर्व भारतातील नागरिकांनी 84 टक्के आणि पश्चिम भारतातील नागरिकांनी 80 टक्के रेटिंग पॉइंट दिले आहेत. याच दरम्यान, टियर 1 आणि टियर 3 शहरांनी क्रमश: 84 आणि 0 टक्के अप्रुवल रेटिंग दिले आहे.

दक्षिण भारतातील नागरिकांनी दिले सर्वाधिक कमी मत
पंतप्रधानांना अप्रुवल रेटिंगमध्ये वयाच्या 45 वर्षाहून अधिक वयोगटातील नागरिक 75 टक्के, 18-30 वयोगटातील 75 टक्के नागरिकांचा समावेश आहे. सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना महानगरांमध्ये थोडी कमी रेटिंग मिळाली आहे. टियर 2 शहरांमध्ये 62 आणि 64 टक्के मत दिले आङे. याशिवाय स्वयंरोजगार असणाऱ्यांनी 59 टक्के आणि दक्षिण भारतातील नागरिकांनी केवळ 35 टक्के मत दिले आहे.

सर्व्हेक्षणानुसार, ज्या क्षेत्रामध्ये मोदी सरकारने उत्तम कामगिरी केल आहे तेथे मुख्य रुपात शिक्षण, स्वच्छता आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील आहे. याशिवाय ज्या भागात सरकारने सरासरी काम केले त्यामध्ये प्रदूषण आणि पर्यावरणाचे मुद्दे (56 टक्के), गरीबी कमी करणे (45 टक्के), महागाई नियंत्रित करणे (44 टक्के), बेरोजगारीवर तोडगा (43 टक्के) आणि भ्रष्टाचार हटविणे (42 टक्के) यांचा समावेश आहे.

आणखी वाचा : 

Sandeshkhali : पश्चिम बंगालमध्ये ममता सरकारची दादागिरी! कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही शहाजहान शेखला सीबीआयकडे सोपवण्यास नकार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज होणार देशातील पहिल्या 'अंडर वॉटर मेट्रो' प्रकल्पाचे उद्घाटन, जाणून घ्या खासियत

Lok Sabha Election 2024 : येत्या 14-15 मार्चला लोकसभा निवडणुकीच्या ताराखा जाहीर होण्याची शक्यता, सात टप्प्यात मतदान होणार?

Read more Articles on