पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचा शुभारंभ, रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला दाखवला झेंडा

| Published : Mar 06 2024, 01:02 PM IST

Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचा शुभारंभ, रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला दाखवला झेंडा
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी मेट्रो मार्गाचे भूमिपूजन करण्यात आले. रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी, पुणे या मार्गाला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी मेट्रो मार्गाचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी, पुणे या मेट्रोला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला.

पंतप्रधानांनी आज कोलकाता येथून विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील या मेट्रो प्रकल्पांची दूरदृश्यप्रणालीद्वारे सुरुवात केली. या कार्यक्रमासाठी सह्याद्री अतिथीगृह येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सहभागी झाले होते.

पंतप्रधान लोकार्पण करत असलेल्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मेट्रो मार्ग सहा किलोमीटरचा असून 5 फेब्रुवारी 2024 रोजी या मेट्रोची ट्रायल रन झाली आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे भूमिपूजन देखील करण्यात आले. हा मार्ग 4.4 किमीचा असून पूर्णपणे उन्नत मार्ग आहे. यामुळे स्वारगेट ते पीसीएमसी कॉरिडॉर हा निगडीपर्यंत विस्तारित होणार आहे.
🕥 10.25am | 6-3-2024 📍 Sahyadri Guest House, Mumbai 

LIVE | Flagging off Pune Metro’s Ruby Hall Clinic to Ramwadi route and Bhumipujan of PCMC to Nigdi at the hands of Hon PM Narendra Modi ji@narendramodi @metrorailpune#Maharashtra #PuneMetro https://t.co/CnrauIrqsj

यापूर्वी 6 मार्च 2022 रोजी पीसीएमसी ते फुगेवाडी या सात किलोमीटर आणि वनाज ते गरवारे पाच किलोमीटर मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले होते फुगेवाडी ते सिविल कोर्ट 6.91 किमी आणि गरवारे ते रुबी क्लिनिक 4.75 किमी अशा मेट्रोच्या टप्प्यांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते 1 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आले होते आणि आज रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या सहा किलोमीटर मार्गाचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.

रेल्वे, मेट्रो सेवेमुळे विकासाला मोठा वेग - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या पावणेदोन वर्षांपासून महाराष्ट्रात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. महाराष्ट्रातील रेल्वे आणि मेट्रोसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली आहे, ज्याचा फायदा नागरिकांना होत आहे.

आज लोकार्पण करण्यात आलेल्या पुण्यातील मेट्रो मार्गाचे भूमिपूजन देखील प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते आणि आज त्यांच्याच हस्ते ही मेट्रो सेवा सुरू देखील झाली आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे स्मार्ट आणि दर्जेदार वाहतुकीची गरज आहे. मेट्रो सेवेमुळे ही गरज पूर्ण होऊन इंधन आणि वेळेत देखील मोठी बचत होणार आहे. मोदींची गॅरंटी असलेले सर्व प्रकल्प आणि विकास कामे गतीने सुरू असल्यामुळे महाराष्ट्राला मोठा फायदा होत आहे.
आणखी वाचा - 
Sandeshkhali : पश्चिम बंगालमध्ये ममता सरकारची दादागिरी! कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही शहाजहान शेखला सीबीआयकडे सोपवण्यास नकार
EV Vehicle : इलेक्ट्रिक कार या पेट्रोल आणि डिझेल गाड्यांपेक्षा जास्त प्रदूषण करतात? अभ्यासात करण्यात आला दावा
चीनमधून कराचीला जाणाऱ्या जहाजात संशयास्पद उपकरणे आढळले, डीआरडीओने केला खुलासा