सार

PM Narendra Modi At Shrinagar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगर दौऱ्यादरम्यान एका कार्यक्रमामध्ये मधमाशी पालनाचा व्यवसाय करणाऱ्या तरुणासोबत सेल्फी काढला. पंतप्रधान मोदींनी हे फोटो सोशल मीडियावर देखील शेअर केले आहेत.

PM Narendra Modi At Shrinagar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (7 मार्च 2024) श्रीनगरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केले. सभेमध्ये सहभागी होण्यापूर्वी त्यांनी सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यापैकीच एक होते नाझीम नजीर. संभाषण पूर्ण झाल्यानंतर पुलवामा जिल्ह्याच्या नाझीमने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींसोबत सेल्फी काढण्याचे नाझीमचे स्वप्न होते. पंतप्रधान मोदींनीही निराश न करता लगेचच सेल्फी काढून नाझीमचे स्वप्न पूर्ण केले. पंतप्रधानांनी एसपीजी कमांडोंना कार्यक्रमानंतर नाझीमला आपल्याकडे आणण्यास सांगितले. पंतप्रधान मोदींचे भाषण पूर्ण झाल्यानंतर कमांडो नाझीमला PM मोदींकडे घेऊन गेले आणि त्यांनी सेल्फी काढला.

सेल्फी आणि चर्चा

पंतप्रधान मोदी यांनी नाझीमसोबत काढलेले फोटो सोशल मीडियावरही शेअर केले आहेत. फोटो पोस्ट करत पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, "माझा मित्र नाझीमसोबतचा एक संस्मरणीय सेल्फी. त्याच्या चांगल्या कामामुळे मी प्रभावित झालो. त्याने सेल्फीसाठी विनंती केली होती. त्याला भेटून मला आनंद झाला. भविष्यासाठी त्याला शुभेच्छा."

सेल्फी काढण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी मधमाशी पालनाचा व्यवसाय करणाऱ्या नाझीमसोबत चर्चा देखील केली. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली तेही जाणून घेऊया…

नाझीम नजीर : मी मधमाशी पालनाचा व्यवसाय करतो. हा व्यवसाय सुरुवातीस दोन पेट्यांपासून सुरू केला होता. यानंतर शासनाकडून 50 टक्के अनुदानावर 25 पेट्या मिळाल्या. यातून माझे उत्पन्न 60 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. यानंतर हळूहळू आता 200पर्यंत पेट्यांची संख्या वाढवली. पूर्वी मी बाटलीतून मध विकायचो. पण आता यासाठी मी वेबसाइट देखील तयार केली. याद्वारे मी माझा एक मोठा ब्रँड तयार केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी : नाझीम शिकत असताना तुझे स्वप्न काय होते?

नाझीम नजीर : मी डॉक्टर-इंजिनिअर व्हावे, अशी कुटुंबीयांची इच्छा होती. पण मी माझ्या मनाचे ऐकले आणि मधमाशी पालनाचा व्यवसाय पुढे वाढवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी : नाझीम आपण गोड क्रांती घडवून आणली आहे. सुरुवातीस तुम्हाला यामध्ये कोणत्या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागला?

नाझीम नजीर : सुरुवातीच्या काळात मदतीसाठी मी अनेक जिल्ह्यांमध्ये गेलो होते. पण मदत मिळाली नाही. अखेर कृषी विभागाशी संपर्क साधला. येथून मला मदत मिळाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी : शेतकऱ्यांच्या हे लक्षात येतंय का? की तुम्ही त्यांची देखील मदत करताय?

नाझीम नजीर : हो सर, शेतकरी आम्हाला मधमाश्यांच्या पेट्या ठेवण्यासाठी मोफत जमीन देताहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी : वेगवेगळ्या प्रकारच्या मधासाठी लोक वेगवेगळ्या फुलांजवळ मधमाश्यांच्या पेट्या ठेवतात. यामुळे वेगवेगळ्या चवीचे मध मिळते. जम्मू-काश्मीरमध्येही असेच काहीसे घडत आहे का?

नाझीम नजीर : काश्मीरमधील मधास मोठ्या प्रमाणात मागणी आहे. एक किलो मधाची किंमत आज एक हजार रूपयांपर्यंत पोहोचली आहे. सर तुमच्यासोबत सेल्फी काढायचा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी : मी प्रयत्न करतो. एसपीजी कमांडोंसोबत संवाद साधतो आणि त्यांना तुम्हाला माझ्याकडे घेऊन येण्यास सांगतो.

आणखी वाचा

UPA VS NDA : आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय विकासाचा आनंद, मोदी सरकारच्या काळात असे बदलले महिलांचे आयुष्य

पुढील पाच वर्षांमध्ये भारत जगाच्या विकासाचे कारण ठरेल, IMF चे भाकीत

Rameshwaram Cafe Blast : रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्याची माहिती देणाऱ्याला मिळणार 10 लाख रुपयांचे बक्षीस, NIA ने केली घोषणा