सार

बंगळुरूतील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट घडण्याच्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने स्फोटाला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीची माहिती देणाऱ्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याची घोषणा केली आहे.

Rameshwaram Cafe Blast : बंगळुरूतील कॅफेमध्ये झालेल्या स्फोटासंदर्भात राष्ट्रीय तपास संस्थेकडून (NIA) सातत्याने तपास केला जात आहे. अशातच राष्ट्रीय तपास संस्थेने बॉम्ब ठेवणाऱ्या व्यक्तीवर बक्षीस लावत माहिती सांगण्याऱ्याला 10 लाख रुपये मिळणार असल्याची घोषणा केली आहे. खरंतर, रामेश्वर कॅफेमध्ये 1 मार्च रोजी दुपारी स्फोट झाल्याची घटना घडली होती. यामध्ये नऊजण जखमी झाले होते.

रामेश्वरम कॅफेमधील स्फोटाप्रकरणात गृह मंत्रालयाने राष्ट्रीय तपास संस्थेला अधिक तपासाचे अधिकार दिले आहेत. स्फोटासंबंधित एक सीसीटिव्ही फुटेज देखील समोर आला होता. यामध्ये एक संशयित व्यक्ती दिसून आला आहे.

40-50 सीसीटिव्ही फुटेज पाहिले गेलेत
रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटात आतापर्यंत 40-50 सीसीटिव्ही फुटेज पाहिले गेले आहेत. आरोपीबद्दल अधिक चौकशी केली जात आहे. याशिवाय कॅफेच्या मालकांनी म्हटले की, स्फोटाचा संबंध व्यावसायिक प्रतिस्पर्ध्याशी नाही आहे. या प्रकरणात कर्नाटकाच्या गृहमंत्र्यांनी आश्वासन दिलेय की, आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल.

आरोपीची माहिती देणाऱ्याला बक्षीस
राष्ट्रीय तपास संस्थेने रामेश्वरम स्फोटाच्या घटनेत नागरिकांची मदत मिळण्यासाठी बक्षीस जाहीर केले आहे. याशिवाय माहिती सांगणाऱ्या व्यक्तीच्या नावाची गुप्तता राखली जाईल. जेणेकरुन आरोपीबद्दल अधिक माहिती मिळण्यास मदत होऊ शकते.

राष्ट्रीय तपास संस्था बंगळुरू यांच्याकडून एक क्रमांक जारी करण्यात आला आहे. या क्रमांकावर आरोपीबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास सूचना देण्यास सांगितले आहे. नागरिकांनी 08029510900 किंवा 8904241100 क्रमांकावर फोन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी वाचा : 

Rajsthan : राजस्थानमधील शिक्षक वर्गात राक्षस बनत आहेत, नेमकं काय आहे प्रकरण?

चीनमधून कराचीला जाणाऱ्या जहाजात संशयास्पद उपकरणे आढळले, डीआरडीओने केला खुलासा

Sandeshkhali : संदेशखळीचा मुख्य आरोपी शाहजहान शेखला सीबीआयकडे सोपवले जाणार, त्याच्याविरुद्ध दोन डझनहून जास्त तक्रारी