Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुसंदर्भात महत्त्वाची बैठक, 100 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

| Published : Mar 01 2024, 01:19 PM IST / Updated: Mar 21 2024, 05:47 PM IST

Narendra Modi chaired BJP CEC meeting
Lok Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुसंदर्भात महत्त्वाची बैठक, 100 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी रात्री भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीदरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षातील उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली.

Lok Sabha Polls : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (29 फेब्रुवारी)  रात्री भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरू झाली असता ती शुक्रवारी (1 मार्च) पहाटे संपली. या बैठकीदरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) भाजप पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्या जाणाऱ्या उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली. याशिवाय बैठकीत उमेदवारांच्या पहिल्या यादीत 100 नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

बैठकीसाठी भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि राजनाथ सिंह उपस्थितीत होते. बैठकीत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल, मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही उपस्थितीत होते.

भाजपकडून लवकरच पहिली यादी जारी केली जाऊ शकते
आगामी लोकसभा निवडणुका एप्रिल-मे महिन्यात होणार आहे. निवडणुक आयोगाद्वारे लवकरच निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात. अशातच भाजपकडून त्याआधी आपल्या उमेदवारांची यादी जारी केली जाऊ शकते. यंदाच्या निवडणुकीत भाजपचे 370 जागांचे लक्ष्य आहे. याआधी पक्षाकडून त्या मतदारसंघावर अधिक लक्ष दिले जात आहे जेथे वर्ष 2019 मध्ये पराभव स्विकारावा लागला होता.

आणखी वाचा : 

UPA vs NDA: 10 वर्षांत अन्नधान्याची सरकारी खरेदी 761.40 वरून 1062.69 लाख मेट्रिक टनांपर्यंत वाढली, 1.6 कोटी शेतकऱ्यांनी घेतला फायदा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मायइक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांची भेट, सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत म्हणाले...

India Q3 GDP : तिसऱ्या तिमाहीत जीडीपी 8.4 टक्क्यांवर, आरबीआयच्या अंदाजापेक्षाही अधिक

Read more Articles on