सार

सरकारने सांगितले की, तिसऱ्या तिमाहीतील देशाचा जीडीपी वाढीचा दर 8.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. अर्थव्यवस्थेची ही आकडेवारी पूर्नानुमानापेक्षा अधिक आहे.

India Q3 GDP : सरकारच्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी जारी करण्यात आली आहे. यावरुन दिसतेय की, भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात आहे. खरंतर, सरकारने म्हटलेय तिसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी वाढीचा दर (GDP Growth Rate) 8.4 टक्के राहिला आहे. अर्थव्यवस्थेची ही आकडेवारी पुर्नानुमानापेक्षा काही पटींनी अधिक आहे. देशात मॅन्युफॅक्चरिंग अ‍ॅक्टिव्हिटीज आणि शासकीय खर्चात तेजी आल्याने जीडीपी वाढीचा दर अधिक वाढला गेला आहे. गेल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 7.6 टक्के होता.

दरम्यान, भारत जगात सर्वाधिक झपाट्याने पुढे जाणारी अर्थव्यवस्था बनला आहे. याचे कौतुक वर्ल्ड बँक (World Bank) ते आयएमएफ (IMF) यांनी केले आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाद्वारे 29 फेब्रुवारीला जीडीपीची आकडेवारी जारी करण्यात आली आहे. यानुसार, डिसेंबरच्या तिमाहीत भारतातील जीडीपी वेगाने पुढे जात असल्याचे दिसून आले. वर्ष-दर-वर्ष 8.4 टक्क्यांचा हा दर वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीनंतर सर्वाधिक वाढला गेला असून जो 6.6 टक्के पुर्नानुमानापेक्षा अधिक आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेला वेग येत असल्याने राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) आपल्या दुसऱ्या पुर्नानुमानात आर्थिक वर्ष 2023-24 साठी देशाचा जीडीपी वाढीचा दर 7.6 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. याआधी जानेवारी 2024 रोजी जारी करण्यात आलेल्या पुर्नानुमानात सुरू असलेल्या आर्थिक वर्षासाठी जीडीपी दरवाढीचा वेग 7.3 टक्के राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी एसबीआयच्या (SBI) आर्थिक संशोधन विभागाने जीडीडी वाढीचा दराचा अंदाज बांधत आपले विश्लेषण जारी केले होते. संस्थेने जीडीची वाढीचा दर 6.8 टक्के राहिल असा अंदाज व्यक्त केला होता. आरबीआयने (RBI) देखील आर्थिक वर्ष 2023-24 च्या तिमाहीत जीडीपी दरवाढीचा वेग 6 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

आणखी वाचा : 

PM Surya Ghar Muft Bijli Yojana : पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत एक कोटी घरांवर लावण्यात येणार सोलर पॅनल्स, 300 यूनिट वीज मोफत मिळणार

Watch Video: तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहांला अटक केल्यानंतर संदेशखळीतील नागरिकांनी व्यक्त केला आनंद

Income Tax मध्ये सूट मिळवण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये गुंतवणूक करताय? आधी हे वाचा