सार
PM Modi Pran Pratishtha Ritual : अयोध्येमध्ये राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचे ऐतिहासिक कार्य संपन्न झाले आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी तीर्थ प्राशन करून आपला 11 दिवसांचा उपवासही सोडला.
PM Modi Breaks Fast : अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामलला यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा शुभ मुहूर्तावर संपन्न झाला आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला 11 दिवसांचा उपवास सोडला.
स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी दिलेले तीर्थ प्राशन करून पंतप्रधानांनी आपला उपवास सोडला. आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना स्वामी गोविंद देव गिरी महाराज भावूक झाले. ते म्हणाले की,"छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर देशाला एक असा राजा लाभला आहे, जो कठोर तपश्चर्या करण्यास घाबरत नाही".
पंतप्रधान मोदी यांच्या विशेष अनुष्ठानाचे कौतुक
रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाहीर आभार मानले. आपल्या भाषणादरम्यान ते म्हणाले की, “मी पहिल्यांदाच असे पाहिलंय की एका नेत्याने एखाद्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी स्वतःहूनच तपश्चर्या, उपवासाची माहिती यादी स्वरुपात तयार करून देण्यास सांगितले. यानंतर आम्ही त्यांना तीन दिवस उपवास करायला सांगितले. पण आमच्या पंतप्रधानांनी 11 दिवस उपवास केला. आम्ही त्यांना एका वेळेचे भोजन करण्यास सांगितले, पण त्यांनी अन्नत्याग करत फलाहार केला. आम्ही त्यांना सांगितले की तुम्हाला झोपण्यासाठी केवळ एका घोंगडीचा वापर करायचा आहे आणि त्यांनी संपूर्ण अनुष्ठानादरम्यान या संकल्पाचे पालनही केले. इतक्या थंडीतही त्यांनी आपला संकल्प मनापासून पूर्ण केला आणि यानंतर मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्येही सहभागीही झाले”.
“शिवाजी महाराजांनंतर असा राजा देशाला मिळाला”
स्वामी गोविंद देव गिरी महाराज भाषणादरम्यान असेही म्हणाले की, "मला शिवाजी महाराज यांचा उल्लेख यानिमित्ताने करावासा वाटतो. कारण भारताच्या महान परंपरेमध्ये शिवाजी महाराज यांच्यासारखा अन्य राजा लाभला नाही. आता पंतप्रधान मोदी यांच्या रूपात असा राजा आपल्याला लाभला आहे.
शिवाजी महाराज श्रीशैलम येथे गेले होते, तेव्हा त्यांनी तीन दिवसांचा उपवास केला व ते मंदिरातच राहिले होते. यावेळेस महाराजांनी सांगितले की, मी येथून जाणार नाही आणि संन्यास घेईन. पण ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांना समजावले आणि त्यांना पुन्हा राज्यात घेऊन आले. पंतप्रधान मोदी देखील असेच आहेत, त्यांना माता भगवतीने हिमालयातून पुन्हा पाठवले आणि भारत मातेची सेवा करा", असे सांगितले.
आणखी वाचा :