EV Vehicle : इलेक्ट्रिक कार या पेट्रोल आणि डिझेल गाड्यांपेक्षा जास्त प्रदूषण करतात? अभ्यासात करण्यात आला दावा

| Published : Mar 06 2024, 12:31 PM IST / Updated: Mar 06 2024, 12:35 PM IST

electric vehicles

सार

अनेक लोक पर्यावरण बदलामुळे चिंतेंत आहेत. अशावेळी इलेक्ट्रिक गाड्यांमुळे जास्त प्रदूषण होत असल्याचा एक दावा करण्यात आला आहे. 

अनेक लोक पर्यावरण बदलामुळे चिंतेत असून ते पर्यावरणाला पूरक असणाऱ्या वाहतुकीबाबत सुज्ञ होत आहेत. अनेक लोकांचा पेट्रोल आणि डिझेल गाड्यांपेक्षा इलेक्ट्रिक गाड्या घेण्याकडे कल वाढताना दिसत आहे.

उत्सर्जन डेटाचे विश्लेषण करणारी फर्म एमिशन ॲनालिटिक्सने अभ्यास केला आहे. त्या अभ्यासात होणाऱ्या कण प्रदूषणाकडे लक्ष वेधण्यात आले आहे. इव्ही गाड्या त्यांच्या वजनामुळे आधुनिक वाहनांच्या तुलनेमध्ये ब्रेक आणि टायरमधून जास्त कण बाहेर सोडतात. अभ्यासानुसार हे तब्बल 1850 पट जास्त असू शकते.

अभ्यासानुसार उत्सर्जन विश्लेशणनारे हे निदर्शनास आले आहे की इव्हीच्या जास्त वजनामुळे टायर खराब होतात आणि हवेत हानिकारक रसायने सोडतात. याचे महत्वाचे कारण म्हणजे बहुतेक टायर हे कच्या तेलापासून तयार केलेल्या सिंथेटिक रबरापासून बनवलेले असतात.

यामध्ये इव्ही गाड्यांच्या बॅटरीच्या वजनावर माहिती देण्यात आली आहे. ईव्हीएमध्ये जास्त जड बॅटरी असल्यामुळे ब्रेक आणि टायरवर दबाव पडतो. त्यामुळे त्यांची झीज लवकर होते. या अहवालात टेस्ला आणि फोर्डचे उदाहरण देण्यात आले आहेत. अभ्यासात प्रामुख्याने ब्रेक आणि टायरमधून बाहेर पडणाऱ्या कणांमुळे होणारे प्रदूषण लक्षात घेणे आवश्यक आहे.
आणखी वाचा - 
Sandeshkhali : पश्चिम बंगालमध्ये ममता सरकारची दादागिरी! कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही शहाजहान शेखला सीबीआयकडे सोपवण्यास नकार
EV Vehicle : इलेक्ट्रिक कार या पेट्रोल आणि डिझेल गाड्यांपेक्षा जास्त प्रदूषण करतात? अभ्यासात करण्यात आला दावा