PM Modi to hoist flag at Ayodhya Ram Mandir : उद्या अयोध्येत मोदींचा रोड शो आयोजित केला आहे. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. मंदिर बांधकाम पूर्ण झाल्यानिमित्त हा कार्यक्रम होणार आहे.

PM Modi to hoist flag at Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिरात उद्या (२५ नोव्हेंबर) ध्वजारोहण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्वजारोहण करतील, RSS प्रमुख मोहन भागवत आणि अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. उद्या अयोध्येत मोदींचा रोड शो देखील होणार आहे. मंदिर बांधकाम पूर्ण झाल्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 2020 मध्ये मंदिराचे बांधकाम सुरू झाले होते आणि 2024 मध्ये मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.