सार
‘गोध्रोनंतरच्या दंगलीतील सत्य अखेर बाहेर येत आहे. तेही सामान्य लोकांना समजेल अशा पद्धतीने. खोटी कथा फार काळ टिकत नाही.
नवी दिल्ली: ‘गोध्रोनंतरच्या दंगलीतील सत्य अखेर बाहेर येत आहे. तेही सामान्य लोकांना समजेल अशा पद्धतीने. खोटी कथा फार काळ टिकत नाही. हळूहळू सत्य बाहेर येणारच’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाचे कौतुक केले आहे.
२००२ मध्ये गुजरातच्या गोध्रा रेल्वे स्थानकावर अयोध्येतून कारसेवा करून परतणाऱ्या ५९ कारसेवकांसह साबरमती एक्सप्रेस रेल्वेला आग लावण्यात आली होती. त्यानंतर या घटनेचा बदला म्हणून गुजरातमध्ये दंगल झाली. या घटनांना कारणीभूत ठरलेल्या बाबींबद्दल विक्रांत मस्से यांच्या अभिनयाचा ‘साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे.
त्यासंदर्भातील एका ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, गोध्रा हत्याकांड प्रकरणात ज्यामध्ये त्यांना आरोपी म्हणून क्लिनचीट मिळाली होती, त्या प्रकरणातील प्रचलित कथा खोट्या असल्याचे हे चित्रपट उघड करतो.
२००२ मध्ये गोध्रा रेल्वेला आग लावण्याची घटना घडली तेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. नंतर गुजरातमध्ये मुस्लिमांना लक्ष्य करून हल्ले झाले. त्या हल्ल्यांना मोदींनीच पाठिंबा दिला होता, असा आरोप करण्यात आला होता.