काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना पोटाच्या तक्रारींमुळे दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मनालीत झिपलाइन साहसांदरम्यान केबल तुटल्याने एक तरुणी ३० फूट उंचीवरून खाली पडली. या घटनेचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले असून, सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
१२ जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी डीएनए चाचणीनंतर झाली आहे. गुजरातमधील या विनाशकारी विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या २४१ जणांमध्ये रूपाणी होते.
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड येथे हेलिकॉप्टर कोसळून पायलटसह सात जणांचा मृत्यू झाला. केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी दुःख व्यक्त केले आहे.
ब्रिटिश एफ-३५ लढाऊ विमान: अहमदाबादमधील विमान अपघाताचा धक्का पचायच्या आधीच केरळच्या आकाशात आणखी एक धोका निर्माण झाला. यावेळीही ब्रिटिश विमानच अडचणीत सापडले. या घटनेमुळे विमान प्रवासासाठी चिंता निर्माण झाली आहे.
देशभरात कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे चिंता वाढली आहे. २४ तासांत १० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असून, एकूण रुग्णसंख्या ७,३८३ पर्यंत पोहोचली आहे. नवीन प्रकारची लक्षणे कोरोनासारखीच असून, वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे.
एअर इंडिया विमान दुर्घटना: गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाला वगळता सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. पायलट सबरवाल यांचे शेवटचे मेसेज दुर्घटनेच्या चौकशीत महत्त्वाचे ठरले आहेत. धक्कादायक माहिती समोर आली आहे.
इराण आणि इस्रायलमध्ये तणावाचे वातावरण आहे. इस्रायलने इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवर हल्ले सुरू केले आहेत. या तणावाच्या पार्श्वभूमीवर हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत मृतांची संख्या २५० वर पोहोचली आहे. बीजे मेडिकल कॉलेजच्या चार वैद्यकीय विद्यार्थ्यांसह त्यांच्या नातेवाईकांचाही यात समावेश आहे. विमानातून २४२ प्रवासी आणि कर्मचारी होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारपासून ४ दिवसांच्या कॅनडा, सायप्रस आणि क्रोएशिया दौऱ्यावर जाणार आहेत.
India