अभिनेत्री करिष्मा कपूरचा तिचा पती संजय कपूरशी घटस्फोट झाला होता. त्याच्या नावावर असणाऱ्या ३०,००० कोटींच्या संपत्तीची चर्चा मृत्यूनंतर ६ महिन्यांनी सुरु झाली आहे. आज पाऊस संमिश्र राहणार असून काही ठिकाणी मुसळधार कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
श्रावण महिना हा भगवान शिवाला समर्पित असून, भक्त श्रावणी सोमवार व्रत पाळतात. माता पार्वतीने सोळा सोमवार व्रत केल्याने या व्रताला विशेष महत्व आहे. व्रत पाळल्याने आरोग्य, समृद्धि, मानसिक शांती आणि मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे.
५ व्या क्रमांकाची कोनेरू हंपी आणि १८ व्या क्रमांकाची दिव्या देशमुख यांच्यात अंतिम सामना झाला. दोघींनीही उपांत्य फेरीत अनुक्रमे लेई तिंगजी आणि टॅन झोंगयी या चिनी प्रतिस्पर्ध्यांना हरवले होते.
श्रीनगरच्या दाचीगाम उद्यानाजवळ झालेल्या चकमकीत पहलगाम हल्ल्याशी संबंधित तीन विदेशी दहशतवादी ठार झाले. गुप्तचर सूचनांनंतर सुरू करण्यात आलेल्या या कारवाईत लष्कर, जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफ सहभागी होते. तपास सुरू आहे.
त्यांना मिळालेले बाळ जैविकदृष्ट्या त्यांचे नव्हते. नंतर झालेल्या डीएनए चाचणीने सिद्ध केले की हे बाळ सरोगसीद्वारे जन्मलेले नसून ते आसाममधील एका गरीब कुटुंबाकडून विकत घेतले गेले होते आणि सरोगसीच्या नावाखाली या जोडप्याला दिले गेले होते.
बाराबांकी येथील औसानेश्वर मंदिरात वीजेच्या करंटमुळे भाविकांमध्ये गदारोळ निर्माण झाला. अशातच दोन जणांचा मृत्यू झाला असून 29 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
लोकसभेतील चर्चेला सुरुवात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या भाषणाने होणार असल्याचे पीटीआय वृत्तसंस्थेने दिले आहे.
28th July 2025 Updates: आज महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आमदार एकनाथ खडसे यांचे जावई पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडले असून त्यावरून वेगवेगळे दावे केले जात आहेत. आज घाटमाथ्यावर जास्त पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
देशात आज 26 वा कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. खरंतर, हा दिवस भारतीय सैन्याचे धाडस, शौर्य आणि बलिदानाचे प्रतीक आहे. याच निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या सपूतांना आदरांजली वाहिली आहे.
नवी दिल्ली - भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास स्पष्टपणे दिसून येत असून २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशाचे प्रति व्यक्ती उत्पन्न वाढून ₹1,14,710 इतके झाले आहे. ही माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत सादर केलेल्या अहवालात दिली आहे.
India