मेलबर्न कसोटीत भारताच्या पराभवानंतर त्यांची ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची शक्यता कमी झाली आहे. बॉर्डर-गावस्कर करंडकातील उर्वरित निकाल भारताच्या WTC 2025 अंतिम संधीसाठी महत्त्वपूर्ण ठरतील.
बिहारमध्ये BPSC ७०वी पीटी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. खान सर यांच्या विरोधात निदर्शने झाली आणि गुरु रहमान व्यासपीठावर कोसळले. प्रशासनाने शिक्षकांवर कारवाई केली आहे.
भाजप नेते आणि पश्चिम दिल्लीचे माजी खासदार प्रवेश वर्मा यांनी आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या जागेबाबत एक मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की केजरीवाल आपली निवडणूक जागा बदलू शकतात.
वर्ष 1998 मध्ये टाटा मोटर्स यांनी आपली पहिली पॅसेंजर कार ''इंडिका' मार्केटमध्ये लाँच केली. हा रतन टाटा यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. कारला मार्केटमध्ये हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. कंपनी सातत्याने तोट्यात जात होती.
टिकीट खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने एका व्यक्तीने रेल्वेच्या बोगीखाली बसून तब्बल २५० किमी प्रवास केल्याची धक्कादायक घटना २४ डिसेंबर रोजी घडली.
१९९१ मध्ये पी.व्ही. नरसिंह राव यांच्या एका फोन कॉलमुळे डॉ. मनमोहन सिंग राजकारणात आले. अमेरिकेशी अणु करारावर स्वाक्षरी हा त्यांच्यासाठी अविस्मरणीय क्षण होता, तर आरोग्य क्षेत्रात अपेक्षित योगदान न देऊ शकल्याने त्यांना दुःख झाले.
मेघालयातील चर्चमध्ये एका व्यक्तीने 'जय श्रीराम' घोषणा दिल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ही कृती मुद्दामहून केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या मनात एक इच्छा होती जी कधीच पूर्ण झाली नाही. त्यांना त्यांच्या पाकिस्तानातील गावात जायचे होते आणि त्यांची जुनी शाळा पहायची होती.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे ९२ व्या वर्षी निधन झाले. ते दिल्लीतील मोतीलाल नेहरू रोडवरील बंगला क्रमांक ३ मध्ये १० वर्षे राहात होते. सरकारने ७ दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. त्यांचे सावत्र भाऊ दलजित सिंग हे भाजप नेते आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. दलजित सिंग २०१४ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये सामील झाले होते.
India