काँग्रेस उमेदवार कन्हैय्या कुमारवर दिल्लीमध्ये हल्ला झाला असून यावेळी त्याच्यावर शाई फेकण्यात आली आहे. या हल्ल्याच्या वेळी येथे महिलांना मारहाण करण्यात आली असून हल्लेखोरांनी व्हिडीओ पोस्ट करून हल्ल्याचे समर्थन केले आहे.
राज्यसभा सदस्या स्वाती मालिवाल यांचे इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी मधून शिक्षण झाले असून आम आदमी पक्षात त्या सुरुवातीपासून काम करत होत्या. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पीएने त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
ईडीने ताज्या पुरवणी आरोपपत्रात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपी म्हणून ठेवण्यात आले आहे. हे प्रकरण दिल्ली मद्य उत्पादन शुल्क धोरण 2021-22 शी संबंधित आहे.
मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला उदयपूर, राजस्थान येथून अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले जाणार आहे.
मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असून 75 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बचाव कार्य थांबवण्यात आले आहे. पोलीस होर्डिंग कंपनीच्या मालकाची कसून चौकशी करत आहेत.
आप खासदार स्वाती मालिवाल यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मारहाण करण्यात आली होती. याबाबतचे निवेदन स्वाती यांनी पोलिसांना दिले असून गेले काही दिवस माझ्यासाठी कठीण होते असेही ट्विट करून सांगितले आहे.
उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतूडी यांनी चार धाम मंदिराच्या परिसरात व्हिडीओ किंवा रिल्स बनवण्यावर बंदी घातली आहे. चार धाम यात्रेसाठी होणारी भाविकांची गर्दी पाहता मुख्य सचिवांनी व्हिआयपी दर्शनही बंद केले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पीए विरोधात आप नेत्या स्वाती मालिवाल यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. स्वाती मालिवाल यांना मारहाण झाल्याचे हे प्रकरण आहे. या प्रकरणात आतापर्यंत काय-काय झाले याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
सरकारने साधारणपणे वापरल्या जाणाऱ्या 41 औषधांच्या मधुमेह, हृदय आणि यकृताच्या आजारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सहा फॉर्म्युलेशनच्या किमती कमी केल्या आहेत.अँटासिड्स, मल्टीविटामिन्स आणि अँटीबायोटिक्स ही औषधे स्वस्त होणार आहेत.
अयोध्येतील राम मंदिरानंतर आता बिहारच्या सीतामढी येथे माता सीतेचे भव्य मंदिर उभारलं जाईल, असं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहे.