राजस्थानमधील कोटा येथे भरधाव वेगाने आलेल्या एका कारने चार मुलांसह एका महिलेला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत.

Rajastan : राजस्थानमधील कोटा येथे वेगाने आलेल्या कारने घराबाहेर बसलेल्या एका महिलेसह चार मुलांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत महिलेच्या डोक्याला दुखापत झाली असून मुलं गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर घटना 8 मे रोजी अनंतपुरा येथील रंगबाडीमधील अहुजा नगर येथे घडली आहे. संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

अनंतपुरामधील एएसआय घमंडी लाल यांनी म्हटले की, जखमी महिला इंद्रा बाईचा मुलगा बंटी राठौड, हेमंत राठौड आणि शेजारी मनोज मेहराने तक्रार दाखल केली. यानंतर कार चालक चिराग जांगिडच्या विरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. सध्या आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.

जखमी झालेल्या महिलेचा मुलगा बंटीने म्हटले की, आई बाहेर बसली होती. तर मुलं सायकल घेऊन उभे होते. यादरम्यान वेगाने आलेल्या कारने सर्वांना चिरडले आणि 10 फूट दूरवरपर्यंत खेचत नेले. ओरडण्याचा आवाज आल्यानंतर शेजारील व्यक्ती बाहेर आले. यानंतर कारच्या चालकाला पडकले आणि मारहाण केली. पण संधीचा फायदा घेत चालक फरार झाला.