सार
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बक्षीश उर्फ गोला याने शनिवारी गुरुद्वारा बाबा बीर सिंहमध्ये विटंबना केल्याचा आरोप त्यावर झाला. यानंतर आरोपीला बांधून जागीच बेदम मारहाण करण्यात आली. काय आहे नेमकी प्रकरण वाचा सविस्तर
पंजाबमधील फिरोजपूर येथील गुरुद्वारामध्ये श्रीगुरू ग्रंथ साहिबचा अनादर केल्याच्या आरोपावरून एका तरुणाची बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवक १९ वर्षांचा होता.पोलिसांनी सांगितले की, तल्ली गुलाम गावातील रहिवासी बक्षीस सिंग उर्फ गोला याने बंदाला गावात असलेल्या गुरुद्वारात प्रवेश केल्यानंतर शिखांच्या पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिबचा अपमान केला. त्यानंतर त्याला जागीच पकडण्यात आले आणि जमावाने बक्षीश सिंगला बेदम मारहाण केली. पोलिसांनी या तरुणाला खासगी रुग्णालयात नेले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपवित्र कृत्य केल्यानंतर तरुणाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक लोकांनी त्याला पकडले त्यानंतर त्याला कपड्याने बांधून ठेवण्यात आले. कथित घटनेचे वृत्त पसरताच ग्रामस्थ गुरुद्वारात जमा झाले आणि त्या मुलाला जमावाने बेदम मारहाण केली. तसेच जमावाविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
तसेच या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये लोकांच्या जमावाने आधी बक्षीशला घेरले आणि नंतर त्याला मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला खासगी रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
बक्षीस सिंघच्या वडिलांचे काय म्हणणे :
बक्षीश सिंघचे वडील लखविंदर सिंह यांनी सांगितले की, बक्षीश हा मानसिक आजारी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी अपमानाच्या आरोपाखाली तरुणाविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. बक्षीशच्या वडिलांनी आपल्या मुलाची हत्या करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधीक्षक सौम्या मिश्रासह वरिष्ठ पोलीस अधिकारी गावात पोहोचले.