सार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सरचिटणीस जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीस धाडली आहे. नक्की काय आहे प्रकरण जाणून घ्या सविस्तर...
Nitin Gadkari Legal Notice : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) आणि सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) यांना कायदेशीर नोटीस धाडली आहे. गडकरी यांच्याकडून नोटीस अशा कारणास्तव धाडण्यात आलीय की, काँग्रेसच्या (Congress) सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वरील अकाउंटवर खोटा आणि दिशाभूल करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. याशिवाय काँग्रेसच्या दोन्ही दिग्गज नेत्यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसवर लेखी रुपात माफी मागण्यासही सांगितले आहे.
नितीन गडकरी यांचे वकिल बालेंदु शेखर यांनी म्हटले की, “वृत्त वाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीतील 19 सेकंदाची क्लिप उचलली. याशिवाय क्लिपमध्ये जे काही बोलले जात आहे, त्याचा संदर्भ आणि अर्थ नक्की काय आहे हे लपविण्यात आले आहे. हेच पाहून भाजपचे नेते हैराण झाले होते.”
काँग्रेसच्या सरचिटणीसांनी दिली प्रतिक्रिया
काँग्रेसचे सरचिटणी जयराम रमेश यांनी नितीन गडकरी यांनी धाडलेल्या कायदेशीर नोटीससंदर्भात मीडियाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. जयराम रमेश यांनी म्हटले की, "मी नितीन गडकरी यांनी पाठवलेली नोटीस वाचली. आम्ही कोणतीही चूक केलेली नाही. आम्ही नोटीसला उत्तर देऊ."
व्हिडीओमध्ये नक्की काय म्हटलेय?
काँग्रेसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नितीन गडकरी लल्लनटॉप यांना मुलाखत देत आहेत. खरंतर, नितीन गडकरी देशातील परिस्थितीबद्दल बोलताना दिसतायत. या मुलाखतीमधील लहान क्लिप काँग्रेसने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर शेअर करण्यासह हिंदीमध्ये कॅप्शनही दिले. काँग्रेसने व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “आज गाव, मजूर आणि शेतकरी दु:खी आहे. गावात उत्तम रस्ते नाहीत, पिण्यासाठी पाणी नाही, उत्तम रुग्णालये नाहीत, उत्तम शाहीतळा ना- मोदी सरकारमधील मंत्री नितीन गडकरी.”
आणखी वाचा :