सार
नुकत्याच इंडिया टीव्हीच्या CNX कडून लोकसभा निवडणुकीआधी पश्चिम बंगालमध्ये एक सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेमध्ये सर्व 42 लोकसभा मतदारसंघांमध्ये 5 ते 23 फेब्रुवारीदरम्यान ओपिनियन पोल तयार केला होता.
Lok Sabha Election : आगामी लोकसभा निवडणुकीआधी देशातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या भाजप (BJP) सरकारने देशभरातील 400 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, काही राज्यांमध्ये भाजपला लोकसभा निवडणुकीत आव्हानांचा सामना करावा लागू शकते. त्यापैकीच एक म्हणजे पश्चिम बंगाल. खरंतर, पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा (Mamata Banerjee) दबदबा आहे.
लोकसभा निवडणुकीआधी मतदारांचा कल जाणून घेण्यासाठी देशातील काही टीव्ही चॅनल ओपिनियन पोल (Opinion Poll) तयार करतात. जेणेकरुन कळते की, निवडणुकीत कोणत्या पक्षाचे पारडे अधिक जड असणार आहे.
इंडिया टीव्ही-CNX चा ओपिनियन पोल
इंडिया टीव्ही-CNX कडून आगामी लोकसभा निवडणुकीआधी पश्चिम बंगालमध्ये ओपिनियन पोल तयार केला आहे. या ओपनियन पोलनुसार, जर आता निवडणूक झाल्यास भाजपला पश्चिम बंगालमधील एकूण 42 लोकसभेच्या जागांपैकी 20 जागांवर विजय मिळू शकतो. याशिवाय तृणमूल काँग्रेस भाजपपेक्षा 21 जागांनी आघाडीवर असून दुसऱ्या स्थानावर भाजप आहे. याशिवाय एका जागेवर काँग्रेसला (Congress) विजय मिळू शकतो.
भाजपची स्थिती काय असेल?
इंडिया टीव्ही-CNX च्या सर्वेक्षणानुसार, बंगामध्ये डाव्या आघाडीला विजय मिळू शकत नाही. पश्चिम बंगालमध्ये वर्ष 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला 22 जागांवर विजय मिळवता आला होता. भाजपच्या खात्यात 18 आणि काँग्रेसला दोन जागांवर विजय मिळाला होता. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे एका जागेचे नुकसान होऊ शकते. पण भाजपला दोन जागांवर विजय मिळू शकतो.
दुसऱ्या बाजूला काँग्रेसला एका जागेवर पराभव स्विकारावा लागेल. ओपिनियन पोलच्या मते, टक्केवारीनुसार यंदा तृणमूल काँग्रेसला (TMC) 44.5 टक्के मत मिळण्याचा अंदाज आहे. भाजपला 43 टक्के मतदान, डाव्या आघाडीला 5.68 टक्के आणि काँग्रेसला 3.62 टक्के मतदान होऊ शकते. याशिवाय अपक्षांना तीन टक्के मत मिळू शकतात.
भाजप आणि तृणमूलच्या विजयाचे गणित
इंडिया टीव्ही-CNX च्या ओपिनियम पोलच्या आकडेवारीनुसार, आठ जागांवर उत्तर बंगालमध्ये भाजपला सहा आणि तृणमूल काँग्रेसला दोन जागांवर विजय मिळता येईल. याशिवाय 12 जागा असणाऱ्या दक्षिण पूर्व बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला आठ, भाजपला तीन आणि काँग्रेसला एका जागावर समाधान मानावे लागेल. पाच जागा असणाऱ्या ग्रेटर कोलकातामध्ये तृणमूलला चार जागा, भाजपला एका जागेवर विजय मिळू शकतो. 17 जागा असणाऱ्या दक्षिण पश्चिम बंगालमध्ये भाजपला 10 जागा आणि तृणमूल काँग्रेसला सात जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा :