बंगळुरुतील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटातील संशयिताचा पहिला फोटो आला समोर, पोलिसांकडून UAPA अंतर्गत गुन्हा दाखल

| Published : Mar 02 2024, 10:33 AM IST / Updated: Mar 02 2024, 10:35 AM IST

बेंगलुरु

सार

बंगळुरुतील प्रसिद्ध रामेश्वर कॅफेमध्ये शुक्रवारी स्फोट होत 10 जण जखमी झाले. या प्रकरणात आता संशयिताचा पहिला फोटो समोर आला आहे.

Bengaluru Rameshwaram Cafe Blast :  बंगळुरुतील रामेश्वर कॅफेमध्ये शुक्रवारी (1 मार्च) दुपारी स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत 10 जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. स्फोटासंदर्भात पोलिसांना आता मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी बंगळुरुतील रामेश्वर कॅफेमधील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) तपासून पाहिले असता त्यामध्ये एक संशयित व्यक्ती टोपी, चश्मा आणि मास्क लावून असल्याचे दिसून आले आहे.

पोलिसांच्या सूत्रांनुसार, संशयित व्यक्तीची सध्या ओखळ पटवण्याचे काम केले जात आहे. या व्यक्तीने कॅफेमध्ये प्रवेश केला आणि नाश्ता केला. पण हात धुण्यासाठी गेलेल्या या व्यक्तीने कॅफेमधील हात धुण्याच्या ठिकाणी एका मोठ्या बॅगमध्ये ठेवलेल्या डब्यात IED ठेवल्याने स्फोट झाला.

पोलिसांकडून FIR दाखल
रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणात पोलिसांकडून आयपीसीच्या कलम 307, 471 आणि UAPA च्या 18, 38 सह स्फोटक पदार्थ कायद्याच्या कलम 3 आणि 4 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

याशिवाय घटनास्थळी राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG), बॉम्बनाशक पथक आणि स्थानिक पोलिसांच्या पथकाकडून अधिक तपास केला जात आहे.

कर्नाटकातील गृहमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
कर्नाटकाचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वरा यांनी म्हटले की, "आम्ही काही पथके तयार केली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून काही पुरावे जमा केले आहेत. स्फोट झाला तेव्हा बीएमटीसीची बस (BMTC Bus) त्या मार्गावरुन गेली. संशयित व्यक्ती त्या बसमधून आल्याची आमच्याकडे माहिती आहे. आम्ही आरोपीला लवकरात लवकर अटक करू. आमची पथके उत्तम कामगिरी करत आहे. स्फोटासाठी टायमरचा वापर करण्यात आला होता. घटनास्थळी फोरेन्सिकचे पथक काम करत आहे. आमची दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबत उच्च-स्तरीय बैठक आहे."

आणखी वाचा : 

घड्याळ चोरल्याबद्दल मदरशातील शिक्षकाने विद्यार्थ्याला केली बेदम मारहाण, तोंडावरही थुंकले

Rameshwaram Cafe : बंगळुरूमधील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट, 5 जण जखमी

धक्कादायक! हरियाणात अल्पवयीन मुलीचे अपहरण करत 20 दिवस केला सामूहिक बलात्कार