सार

इराण केलेल्याहल्यानंतर संयुक्त राष्ट्रकडू शांततेचे आवाहन करून देखील इस्रायलने इराणवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचे वृत्त येत आहे. इराणच्या इस्फहान शहरातील विमानतळावर मोठा स्फोट ऐकू आला. मात्र, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Israel Iran Conflict : इराण केलेल्याहल्यानंतर संयुक्त राष्ट्रकडू शांततेचे आवाहन करून देखील इस्रायलने इराणवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचे वृत्त येत आहे. इराणच्या इस्फहान शहरातील विमानतळावर मोठा स्फोट ऐकू आला. मात्र, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.इस्फहानमध्ये इराणी सैन्याचा मोठा हवाई तळ आहे आणि या भागात अण्वस्त्रांशी संबंधित अनेक महत्त्वाचे तळही आहेत.14 एप्रिलला इराणने इस्रायलवर सुमारे 300 क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले होते. इराणने डागलेली सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा इस्रायलने केला होता आणि वेळ आल्यावर प्रत्युत्तर देऊ, असा इशाराही दिला होता. त्यानंतर आता हा हल्ला झाला आहे.

इराणने रविवारी 14 एप्रिल पहाटे 170 ड्रोन, 30 हून अधिक क्रूझ क्षेपणास्त्रे आणि 120 हून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे सोडली होती. आता इराणच्या या हल्ल्याला इस्रायलने प्रत्युत्तर दिलं आहे. इराणच्या वृत्तसंस्थेने दावा केला आहे की, इसाफहान शहरात मोठे स्फोट झाले आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की, हा इस्रायलने केलेला हल्ला होता. इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर आज इस्रायलने इराणवर क्षेपणास्र डागून त्यांना प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे.दरम्यान, जर हा हल्ला झाला असेल तर इराण पुन्हा भडकण्याची चिन्हे आहेत. यामुळे या परिसरात एक मोठे युद्ध सुरू होऊ शकते. असे झाल्यास याचे गंभीर परिमाण भारतासह जगावर होणार आहे.

इराण आणि इस्रायलचा वाद काय ?

खरे तर काही दिवसांपूर्वी सीरियातील इराणच्या वाणिज्य दूतावासावर इस्रायलने हवाई हल्ला केला होता. यात इराणचे बडे लष्करी अधिकारी ठार झाले होते. त्यानंतर इराणने स्थानिक प्रॉक्सीचा वापर करून इस्रायलवर हल्ले सुरू करण्याची योजना आखली. मात्र, इराणने आपल्या मागण्या पूर्ण झाल्यास तणाव कमी करण्यास तयार असल्याचे संकेत दिले होते. तेहरानने स्पष्ट केले की गाझा वरील हल्ले कमी केल्यास इराण वाद वाढवणार नाही. तसेच तणाव निर्माण करणार नाही. गाझा पट्टीतील युद्धबंदीसह आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आपण मागे हटणार नसल्याचे इराणने म्हटले आहे. इराणला आण्विक कार्यक्रमावर पुन्हा चर्चा सुरू करायची आहे. मात्र, इस्रायलने गाझावरील हल्ले सुरच ठेवले आहेत. दरम्यान, अमेरकेने इस्रायलला शांत राहण्याचे आवाहन केले होते. अमेरिकेची मागणी फेटाळून इस्रायलने इराणवर प्रतीहल्ला केल्याने वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.