सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतील भारत मंडपममध्ये विद्यार्थ्यांसोबत 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे.

Pariksha Pe Charcha 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (29 जानेवारी) दिल्लीतील भारत मंडपममध्ये (Bharat Mandapam) विद्यार्थ्यांसोबत 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.या कार्यक्रला सकाळी 11 वाजता सुरूवात होणार आहे.

‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमासाठी देशभरातून दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे. त्यापैकी तीन हजार विद्यार्थ्यांची दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडू सातव्यांदा 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

2.27 कोटी विद्यार्थ्यांनी केले रजिस्ट्रेशन
पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत होणाऱ्या 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमासाठी देशभरातून 2.27 कोटी विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे. विद्यार्थ्यांशिवाय शिक्षक आणि पालकांनीही कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन केले आहे. आतापर्यंत या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन करण्यात आल्याचा सर्वाधिक मोठा रेकॉर्ड झाला आहे. 

‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमासाठी तीन हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले की, या कार्यक्रमाची विद्यार्थ्यांकडून आवर्जून प्रतीक्षा केली जाते. याशिवाय परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी विद्यार्थी अधिक उत्सुकही असतात.

परीक्षा पे चर्चाचे लाइव्ह प्रक्षेपण
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून देशातील सर्व राज्य, केंद्र शासित प्रदेशातील राज्यपाल, उप-राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण दाखवण्याची विनंती केली आहे. याशिवाय देशभरातील शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये देखील या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण दाखवण्यास सांगण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाची सुरुवात वर्ष 2018 पासून केली होती. यंदाचे हे सातवे वर्ष आहे. 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमासाठी दरवर्षी विद्यार्थ्यांचा आकडा वाढत चालल्याचेही सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षी (2023) 31 लाख विद्यार्थ्यांनी कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन केले होते. पण यंदाच्या वर्षी कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशनचा आकडा 2 कोटींच्या पार गेला आहे.

आणखी वाचा : 

Delhi Politics : अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर मोठा आरोप, AAPच्या आमदारांना 25 कोटी रूपयांची ऑफर दिल्याचा दावा

Lok Sabha Elections 2024 : ममता बॅनर्जींचा केंद्र सरकारला या कारणास्तव अल्टीमेटम, नक्की काय आहे प्रकरण जाणून घ्या सविस्तर

Halwa Ceremony : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून हलवा समारंभ संपन्न, येत्या 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार