सार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सनातन परंपरेवर प्रश्न उपस्थितीत केले आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या द्वारका पूजेवरूनही एक विधान केले आहे.

Rahul Gandhi in Pune : काँग्रेस नेते राहुल गांधी रायबरेली (Raebareli) येथून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पुण्यातील सभेला संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी म्हटले की, काँग्रेस संविधाचा बचाव करण्यासाठी लढाई करत आहे. दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस संविधानला नष्ट करू पाहत आहेत. याशिवाय संविधान ज्यावेळी देशातून गायब होईल तेव्हा तुम्ही हिंदुस्थानाला ओखळूही शकणार नाहीत. याशिवाय राहुल गांधींनी सनातन धर्माच्या परंपरेवरही पुन्हा प्रश्न उपस्थितीत केले आहेत.

पुण्यातील सभेत राहुल गांधी काय म्हणाले?
राहुल गांधी यांनी पुण्यातील सभेला संबोधित करताना भाजपचे नेतेमंडळी, आरक्षणासह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. राहुल गांधींनी असे म्हटले की, पंतप्रधान मोदी कधीकधी पाकिस्तानबद्दल बोलतात, कधीकधी नाटक करण्यासाठी पाण्याखाली जातात. याशिवाय राहुल गांधी यांनी सनातन परंपरेवरूनही पुन्हा प्रश्न उपस्थितीत करत म्हटले की, पंतप्रधानांची द्वारका पूजा नाटक आहे.

पुण्यात रवींद्र धंगेकरांना उमेदवारी
काँग्रेसने यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपाने पुण्यातून मुरलीधर मोहेळ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. खरंतर, पुणे लोकसभा ही परंपरागत काँग्रेसची जागा राहिली होती. पण वर्ष 2014 रोजी मोटी लाटेमुळे पुणे लोकसभेची जागा भाजपाच्या खात्यात गेली.

आणखी वाचा : 

असदुद्दीन ओवैसींविरुद्ध लढणाऱ्या माधवी लता किती श्रीमंत ?

अखेर निर्णय झालाच! रायबरेलीतून राहुल गांधी निवडणुकीच्या रिंगणात, वाचा काँग्रेसने अमेठीतून कोणाला दिली उमेदवारी