सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच लक्षद्वीपचा दौरा केला होता. येथील काही सुंदर फोटो पंतप्रधानांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर आता इंटरनेटवर लक्षद्वीपबद्दल सर्वाधिक सर्च केले जात आहे.

Lakshadweep Top Search : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लक्षद्वीपचा दौरा केल्यानंतर या ठिकाणाबद्दल सर्वाधिक चर्चा केली जात आहे. भारतच नव्हे तर जगभरात लक्षद्वीपबद्दल इंटरनेटवर सर्च करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी लक्षद्वीप हे ठिकाण गुगलच्या टॉप ट्रेण्डमध्ये आले होते.

आता देखील इंटनरेटवर जगभरातून लक्षद्वीपबद्दल सर्च केले जात आहे. यामुळे गेल्या 20 वर्षात लक्षद्वीपबद्दल सर्च करण्याचा रेकॉर्ड ब्रेक झाला आहे. तज्ज्ञांच्या मते, या ट्रेण्डमुळे येणाऱ्या काळात लक्षद्वीप पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण होऊ शकते.

पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर लक्षद्वीपचा सोशल मीडियात ट्रेण्ड
कोरोना महामारीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरचा (Jammu-Kashmir) दौरा केला होता. यामुळे जम्मू-काश्मीरमधील पर्यटन व्यवसाय वाढला गेला होता. यंदाच्या वर्षाच्या (2024) सुरुवातीला पंतप्रधानांनी लक्षद्वीपचा दौरा केला.

नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर आपल्या लक्षद्वीपच्या दौऱ्याचे काही सुंदर फोटो शेअर केले होते. याशिवाय देशातील नागरिकांना लक्षद्वीपला येण्याचे अपीलही केले होते. यामुळेच सोशल मीडियामध्ये लक्षद्वीप गुगलच्या टॉप सर्चमध्ये आहे.

पंतप्रधानांच्या लक्षद्वीपच्या दौऱ्यामुळे भारतासोबत शत्रूसारखी वागणूक करणाऱ्य मालदीववर (Maldives) याचा परिणाम होऊ लागला आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मालदीवमधील मंत्र्यांनी केलेल्या विधानामुळे मोठ्या संख्येने भारतीय नागरिकांनी तेथील आपली सहल रद्द केली आहे.

मालदीवच्या मंत्र्यांनी काय म्हटले होते? 
मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती व कला विभागाच्या उपमंत्री मरियन शिउन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोंवर कमेट केली होती. या कमेटमध्ये शिउन यांनी पंतप्रधानांना 'जोकर' आणि 'इज्राइलची कठपुतली' म्हटले होते. याशिवाय सत्ताधारी पक्षाचे नेते झाहिद रझीम यांनी केलेल्या कमेटमध्ये म्हटले होते की, "भारत पैसे कमावण्यासाठी श्रीलंका आणि अन्य लहान देशांच्या अर्थव्यवस्थेची नक्कल करतोय."

लक्षद्वीप बेटावर पर्यटन वाढणार
लक्षद्वीप बेटाचे क्षेत्रफळ केवळ 32 स्क्वेअर किलोमीटर आहे. खरंतर लक्षद्वीप, लहान-लहान आकाराच्या 36 बेटांचा एक समूह आहे. लक्षद्वीपमध्ये निळाशार समुद्र, पांढरी वाळू अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे पर्यटकांचे मन भारावले जाऊ शकते. तरीही लक्षद्वीप येथे अपेक्षेपेक्षा फार कमी पर्यटक येतात. 

लक्षद्वीपमध्ये वर्ष 2022 मध्ये एक लाख परदेशी पर्यटक आले होते. पण देशातील पर्यटकांची संख्या येथे फार कमी आहे. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर लक्षद्वीप येथे पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : 

Boycott Maldives : मालदीवमधील मंत्र्यांनी केलेल्या या विधानानंतर पर्यटकांनी रद्द केल्या टूर, नक्की काय आहे प्रकरण?

Qatal Ki Raat : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा इमरान खान यांच्यासोबत बातचीत करण्यास दिला नकार...वाचा 'कत्ल की रात'चा किस्सा

Ram Mandir Ceremony : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा देशभरातील नागरिकांना पाहाता येणार? BJPकडून केली जातेय खास तयारी