सार
Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील फटाक्यांच्या कारखान्यामध्ये झालेल्या स्फोटामध्ये 12 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर जवळपास 200 जणजखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Harda Factory Blasts Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील हरदा शहरातील मगरधा रोडवरील फटाक्यांच्या कारखान्यामध्ये मंगळवारी (6 फेब्रुवारी 2024) सकाळी स्फोट झाला. या अपघातात 12 हून अधिक लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर जवळपास 200 जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पंतप्रधान मोदींनी मदत जाहीर केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे (Harda Factory Blasts Madhya Pradesh) झालेल्या जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले आणि पीडितांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) X वर पोस्ट करत पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (Prime Minister's National Relief Fund) प्रत्येक मृताच्या नातेवाईकांसाठी 2लाख रुपये तसेच जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.
परिसरातील घरेही आगीच्या भक्ष्यस्थानी
आग लागल्यावर थोड्याच वेळात आगीने रौद्र रूप धारण केले त्यामुळे त्यामुळे आजूबाजूची अनेक घरेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. अपघाताची माहिती मिळाल्यावर लगेच अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्याच्या प्रयत्नात आहेत. तर लोक घरे सोडून जीव वाचवण्यासाठी पळताना दिसत आहेत. जी घरे आगीच्या (Harda Factory Blasts Madhya Pradesh) भक्ष्यस्थानी पडली ती घरे जवळच कारखान्यात काम करणाऱ्या किंवा फटाके बनवणाऱ्या लोकांची असल्याचे सांगण्यात येत आहे.
स्फोटामुळे सहा जणांचा मृत्यू
मध्य प्रदेशातील हरदा येथे भीषण स्फोटामुळे फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग लागली. या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. फटाक्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गनपावडरमुळे कारखान्याला आग लागल्याने परिस्थिती अधिक भीषण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कारखान्याला लागलेल्या आगीचा धूर काही किलोमीटर दूरपर्यंत पसरला आहे. माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी पाठवले. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळलेले नाही. फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीमुळे जवळपासची 50 हून अधिक घरे बाधित झाल्याचे वृत्त आहे. हा स्फोट झाला तेव्हा तेथून जाणाऱ्या लोकांचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. कारखान्यात झालेला स्फोट इतका भीषण होता की, आवाज ऐकताच लोक पळून जाताना दिसत होते.
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केली चौकशी
हरदा येथील फटाका कारखान्यात झालेल्या भीषण अपघातानंतर बचककार्यात मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव जातीने लक्ष घालत आहेत. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली आहे. प्राथमिक माहितीनुसार या कारखान्यात 500 ते 700 लोक काम करत होते.
अनेक लोक अडकल्याची भीती
घटनेची माहिती कळताच भोपाळच्या जेपी हॉस्पिटलमध्ये वेगळा वॉर्ड तयार करण्यात आला आहे. व जखमींच्या उपचारासाठी डॉक्टरही दाखल झाले आहेत. जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अजूनही अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णवाहिकेसह पोलीस व जिल्हा प्रशासनाच्या विविध वाहनांच्या मदतीने जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. फटाक्यांच्या कारखान्याच्या 1 किलोमीटरच्या परिघात वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक
हरदा येथे घडलेल्या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री मोहन यादव यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. त्याबरोबरच अग्नितांडव आटोक्यात आणण्यासाठी आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यांतून अग्निशमन दलाच्या गाड्याही पाठवण्यात आल्या आहेत. हरदा घटनेवर तातडीने कारवाई करत मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी मंत्री उदय प्रताप सिंह, एसीएस अजित केसरी, डीजी होमगार्ड अरविंद कुमार यांना हेलिकॉप्टरने हरदा येथे जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.
प्रशासनाने 100 घरे रिकामी केली
हरदा येथील फटाका कारखान्याला लागलेल्या आगीमुळे जीवितहानी व वित्तहानी झाली आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने शंभरहून अधिक घरे रिकामी केली आहेत. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. तर 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन डझनहून अधिक जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लागोपाठ होत आहेत स्फोट
कारखान्याला लागलेल्या भीषण आगीमुळे कारखान्यातील स्फोट थांबत नसल्याचे सांगण्यात येत आहे. कारखान्यात कारखान्यात स्फोटक साहित्य असल्याने एकामागून एक स्फोट होत आहेत.
आणखी वाचा -
अरविंद केजरीवालांवर ईडीची मोठी कारवाई, खासगी सचिव, आप नेत्यांच्या घरांवर धाड टाकली
Air Pollution in Mumbai : मुंबईकरांना करता येणार वायू प्रदूषणाची तक्रार, डाउनलोड करावे लागणार हे App