सार

Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाडल्या गावातील (Padliya Village) गावकरी आपली देवता म्हणून ज्याची पूजा करत होते ते चक्क डायनासोरचे अंड निघाले आहे.

Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील एक अनोखा प्रकार समोर आला आहे. धार येथील पाडल्या गावातील गावकरी ज्या दगडाला कुलदेवता मानून पूजा करत होते, ते खरंतर डायनासोरचे अंड (Dinosaur Egg) निघाले आहे.

गावकऱ्यांना वाटत होते की, ही देवता आपल्या शेतीची आणि जनावरांपासून गुरांचे रक्षण करेल. पण वैज्ञानिकांनी ज्यावेळी याची तपासणी केली तेव्हा धक्कादायक सत्य समोर आले आहे. हे सत्य ऐकून गावकरी हैराण झाले आहेत.

गावकरी मानत होते कुलदेवता
पाडल्या गावातील गावकऱ्यांना अनेक वर्षांपूर्वी शेतात एक गोलाकार दडग सापडला होता. गावकरी त्या दगडाला एखादा चमत्कार मानून आपली कुलदेवता म्हणून पूजा करू लागले. गावकरी याला कक्कड भैरव म्हणून कुलदैवता मानत होते.

हळूहळू ही बातमी आसपासच्या गावात वाऱ्यासारखी पसरली गेली. दुसऱ्या गावातील गावकरीही त्याची पूजा करू लागले. गावकऱ्यांना वाटत होते, ही कुलदेवता आपली शेती आणि गुरांचे रक्षण करेल.

वैज्ञानिक तपासात धक्कादायक सत्य समोर
काही दिवसांपूर्वी लखनौमधील बिरबल साहनी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलेओसायन्सेस (BSIP) लखनौचे विशेतज्ज्ञ आणि मध्य प्रदेशातील वन विभागाचे अधिकारी धार गावात दगडाला देव मानणाऱ्या प्रकरणाबद्दल अधिक तपासणीसाठी आले.

यानंतर ज्यावेळी विशेज्ज्ञांनी या गोलाकार दगडाला गावकऱ्यांकडून घेतले तेव्हा तपासात कळले, ही कुलदैवतेची मूर्ती नसून डायनोसरच्या टायटॅनोसॉर (Titanosaur) प्रजातीच्या जीवाश्माची अंडी आहेत. ज्याला गावकरी देव मानत होते. आता सत्य समोर आल्यानंतरही गावकरी आम्ही त्या दगडाची पूजा करू असे म्हणत आहेत.

आणखी वाचा: 

काय सांगता! चक्क राम मंदिराच्या थीमवर आधारित तयार केलाय नेकलेस, पाहा VIDEO

ALERT! सॅमसंगचा फोन वापरताय? सरकारने दिला महत्त्वाचा इशारा, धोका टाळण्यासाठी त्वरित उचला हे पाऊल

Article 370 : या न्यायाधीशांनी कलम 370 वर सुनावला ऐतिहासिक निर्णय