सार

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घटानासाठी देशभरात आनंदाचे वातावरण आहे. प्रत्येकजण रामललांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची वाट पाहात आहे. अशातच आता बिहारच्या मंत्र्यांनी प्रभू श्रीराम 22 जानेवारीला अयोध्येत येणार नसल्याचा दावा केला आहे.

Tej Pratap Yadav on Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारले जात आहे. या मंदिराची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे. प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. अशातच लालू प्रसाद यादव यांचा मुलगा आणि बिहारचे मंत्री तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांनी एक विधान केले आहे. तेज प्रताप यादव यांनी केलेल्या विधानाता दावा केलाय की, 22 जानेवारीला प्रभू श्रीराम अयोध्येत येणार नाहीत.

रामलला अयोध्येत येणार नाहीत

तेज प्रताप यादव यांनी म्हटले की, "प्रभू श्रीराम माझ्या स्वप्नात आले होते. श्रीरामांनी मी 22 जानेवारीला अयोध्येत येणार नसल्याचे मला म्हटले. प्रभू श्रीराम हे सर्वकाही ढोंग असल्याचे म्हणत मी अयोध्येत येणार नसल्याचे मला सांगितले. याशिवाय निवडणूका ज्यावेळी येतात तेव्हा राम मंदिराचे नाव घेतले जाते. पण निवडणूका संपल्यानंतर मंदिराबद्दल विसरुन जातात. चार शंकराचार्यांनाही स्वप्न पडले की, हे सर्वजण ढोंग करत आहेत. प्रभू श्रीराम येणार नाहीत."

व्हायरल होतोय व्हिडीओ
बिहारचे मंत्री तेज प्रताप आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहतात. याआधीही तेज प्रताप यांनी त्यांना काही प्रकरणांबद्दल स्वप्न पडल्याचे बोलून दाखवले आहे. पण यावेळी तेज प्रताप यांना राम मंदिराबद्दल पडलेल्या स्वप्नाचा दावा करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

देशभरात रामललांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी उत्साह
22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे. यामुळे देशभरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या दिवशी नागरिक आपल्या घरी दिवे लावणार आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. याशिवाय हनुमान चालीसा, सुंदरकांड पाठ आणि रामायणाचा पाठ काही ठिकाणी पठण केला जाणार आहे.

आणखी वाचा :

गीता प्रेसकडून रामचरितमानस 10 भाषांमध्ये मोफत डाउनलोडची सुविधा, अशी मिळवा पुस्तकाची प्रत

राम मंदिरात VIP दर्शनाच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक, ही चूक करू नका

घरबसल्या मिळणार राम मंदिराचा प्रसाद, जाणून घ्या ऑर्डरची प्रक्रिया