Lifestyle

Ram Mandir

राम मंदिरात VIP दर्शनाच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक, ही चूक करणे टाळा

Image credits: social media

नागरिकांची फसवणूक

अयोध्येतील राम मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केली जात आहे. WhatsAppवर नागरिकांना अज्ञात क्रमांकावरुन रामललांचे व्हीआयपी दर्शन करण्याचा मेसेज पाठवला जातोय. 

Image credits: social media

राम मंदिरात VIP दर्शन

22 जानेवारीला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या दिवशी व्हीआयपी दर्शनाचे तीन मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवले जातायत. ज्यामध्ये राम जन्मभूमी गृहसंपर्क अभियान.APK लिहिलेले आहे. 

Image credits: social media

काय लिहिलेय मेसेजमध्ये?

दुसऱ्या मेसेजमध्ये Install राम जन्मभूमी गृहसंपर्क अभियान to get VIP Access लिहिण्यात आले आहे. याशिवाय ‘शुभेच्छा, तुम्ही भाग्यावान आहात की, राम मंदिराचे व्हीआयपी दर्शन करता येईल.’

Image credits: freepik

व्हॉट्सअ‍ॅपवरील हे मेसेज पाहू नका

चुकूनही तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर आलेले व्हीआयपी दर्शनाचे मेसेज पाहू नका. हे मेसेज APK फाइलमध्ये आहेत. चुकून मेसेजवर क्लिक केल्यास तुमचा फोन हॅक होऊ शकतो.

Image credits: freepik

ही चूक करू नका

राम मंदिराच्या दर्शनासाठी कोणताही मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर आल्यास त्यावर क्लिक करू नका. अन्यथा तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.

Image credits: freepik

मेसेज फॉरवर्ड करणे टाळा

व्हीआयपी दर्शनाचा मेसेज तुम्हाला आल्यानंतर तो दुसऱ्या व्यक्तीला फॉरवर्ड करणे टाळा.

Image credits: freepik

मेसेजबद्दल रिपोर्ट करा

राम मंदिराबद्दल मेसेज आल्यास त्याबद्दल रिपोर्ट करून ब्लॉक करा. रिपोर्ट करण्यासाठी चॅटबॉक्सवर उजव्या बाजूला तीन बिंदूंवरील मेन्यूवर टॅप करा. More Optionमध्ये जाऊन रिपोर्ट करा.

Image credits: freepik