सार

पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती समजली आहे. 

लोकसभा निवडणुकांच्या देशभरातील महाराष्ट्रामधील प्रचारसभांना वेग आला आहे. महायुतीच्या लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पुणे येथे नरेंद्र मोदी येणार आहेत. त्यांच्या सोलापूर आणि कराड येथे सभा होणार असल्याची माहिती देणार आहे. नरेंद्र मोदी हे पुणे येथे सभा होणार असल्याची माहिती देणार आहे. गेल्या वर्षभरात राज्यात घडलेल्या घडामोडींच्या घटनेवर ते काय बोलतात याकडे त्यांच लक्ष आहे. 

पुण्यात मेट्रो प्रकल्प, पुणे शहरातील विविध विकासकामांचे उदघाटन आणि लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त मागील वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दोन दौरे झाले आहेत. पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा होणार असून येथील चार लोकसभा मतदारसंघासाठी महायुती जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे दिसून येत आहे. 

पुण्यातील सभेची तयारी कशी? -
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातील सभेसाठी संध्याकाळी पाच किंवा सहा वाजता हेलिकॅप्टरने येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. येथे सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीचे प्रमुख उमेदवार उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सभेनंतर नरेंद्र मोदी यांचा पुण्यातील राजभवन येथे मुक्काम असणार आहे. या सभेसाठी दीड ते दोन लाख नागरिक उपस्थित राहणार असून 35 हजार लोकांची बसण्याची व्यवस्था येथे केली जाणार आहे. 

पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त वाहतुकीत होणार बदल - 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या निमित्ताने पुण्यातील वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर बदल केले जाणार आहेत. रेसकोर्स परिसरातील पाण्याची टाकी ते टर्फ क्लब चौक रस्त्यावर दुहेरी वाहतूक करण्यात येत आहे. टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार ते टर्फ क्लब चौक रस्ता बंद राहील. सोलापूर रस्त्यावरील अर्जुन रस्ता जंक्शन ते टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार हा रस्ता बंद राहील. तसचे बिशप स्कूल सर्कल ते टर्फ क्लब चौक रस्ता बंद राहील.
आणखी वाचा - 
Maharashtra HSC Board Results 2024 : 12 वी बोर्डाचा निकाल या तारखेला लागण्याची शक्यता, येथे तपासून पाहता येईल रिजल्ट
मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना बसणार उन्हाचा तडाखा, हवामान खात्याचा इशारा