सार

इंस्टाग्रामवर सध्या एका तरुण शेतकऱ्याचा व्हिडीओ (Kerala farmer arrives in Audi) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तुम्ही देखील या शेतकऱ्याचा व्हिडीओ पाहायला तेव्हा नक्कीच थक्क व्हाल आणि म्हणाल, ‘आरारारा खतरनाक!’

 

Kerala Farmer Viral Video : संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी. आपल्याला अन्नधान्य, भाजीपाला, फळांचा पुरवठा व्हावा; म्हणून शेतकरीवर्ग शेतामध्ये राबराब राबतात. कितीही अस्मानी-सुलतानी संकटे आली तर जगाचा पोशिंदा अन्नधान्य पिकवण्याच्या प्रक्रियमध्ये कधीही खंड पडू देत नाही. पण पिकवलेल्या धान्याचा योग्य मोबादला मिळवण्यासाठी आजही शेतकऱ्यांना झगडावे लागतेय, ही बाब दुर्दैवाचीच. 

मात्र सध्या सोशल मीडियावर एका तरुण शेतकऱ्याचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून कोणालाही आनंदच होईल. कारणच तसे आहे. केरळमधील एक तरुण शेतकरी (Kerala Farmer News) थेट शेतातून ताजा पालक (Kerala Farmer Sells Spinach from Audi) निवडून चक्क लाखो रुपये किंमतीच्या कारमधून बाजारात ताजी-ताजी भाजी विकायला जात असल्याचे या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

(इस्रायलमधील भारतीय नागरिक सुरक्षित आहेत का?)

विशेष म्हणजे हा शेतकरी भाजीविक्री करण्यासाठी जी गाडी  घेऊन निघालाय, ते कोणतेही सामान्य वाहन नसून महागडी ‘ऑडी ए4’ कार (Audi A4) आहे. चला तर जाणून घेऊया या तरुण शेतकऱ्याबद्दलची माहिती…(Kerala Farmer Arrives In Audi To Sell Vegetables)

ऑडीमधून भाजीविक्री करणारा शेतकरी आहे तरी कोण?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केरळमधील रहिवासी असलेल्या या शेतकऱ्याचं नाव सुजीत (Kerala farmer sells vegetables in an Audi car) असे आहे. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये जॉब करण्याऐवजी हा शेतकरी शेतामध्ये घाम गाळतोय. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सुजीत शेती करतोय. ऑडी A4 सारख्या आलिशान कारमधून (Kerala Farmer Viral Video) प्रवास करून रस्त्याच्या कडेला जमिनीवर बसून सुजीत जेव्हा भाजी विकतो, तेव्हा परिसरातील स्थानिक देखील आश्चर्य व्यक्त करतात. 

(Girlfriend Murder Case : माथेफिरू प्रियकर! गर्लफ्रेंडची हत्या करून बॉयफ्रेंडनं स्वतःच्या गळ्यावरही केला वार, कारण...)

ऑडीमधून भाजी विकणारा शेतकरी म्हणून सुजीत सध्या येथे खूप प्रसिद्ध झाला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे शेती विषयक प्रोफाइल आहे. या प्रोफाइलद्वारे तो सोशल मीडियावर आपल्या शेतातील, पिकांचे आणि शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे फोटो- व्हिडीओ शेअर करत असतो. त्याच्या या अनोख्या कारनाम्यामुळे या मॉडर्न शेतकऱ्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव केला जातोय.

VIRAL VIDEO : नादच खुळा! चकचकीत पांढऱ्या रंगाच्या कारमधून येतो व बाजारात ताजी भाजी विकतो 

View post on Instagram
 

 

सोशल मीडियावरील लोकप्रियता

सोशल मीडियावर ‘variety_farmer’ या नावाने सुजीतचे (Kerala variety farmer) प्रोफाइल आहे. त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. या प्रोफाइलच्या माध्यमातून सुजीत शेतीशी संबंधित फोटो आणि व्हिडीओ आपल्या फॉलोअर्ससह शेअर करत असतो. याच Instagram Account द्वारे या मॉडर्न शेतकऱ्यानं ऑडीसारख्या महागड्या कारमधून ताजा पालक नेऊन त्याची बाजारात नेऊन विक्री केल्याचा व्हिडीओ शेअर केला होता. 

(ऐकावे ते नवलच! बंगळुरूमध्ये बस स्टॉप गेलं चोरीला, बांधकामासाठी 10 लाख रुपये झाला होता खर्च)

बाजारात पोहोचल्यानंतर त्यानं जमिनीवर एका प्लास्टिक शीट पसरवून त्यावर पालकच्या ताज्या जुड्या ठेवल्या आणि काही वेळातच भाजीची विक्री देखील झाल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. भाजी विकून झाल्यानंतर सुजीत याच आलिशान कारमधून परतीचा प्रवास करत असल्याचंही दिसतंय.

 

View post on Instagram
 

 

महागड्या ऑडी-ए4 कारची किंमत माहितीये?

मिळालेल्या माहितीनुसार, सुजीतकडे असलेली ऑडी A4 कार (Kerala farmer audi A4 price) सेकंडहँड असल्याचे म्हटलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच त्यानं ही कार खरेदी केल्याची माहिती आहे. नवीन Audi A4 कार (Audi A4 Price In Marathi) विकत घ्यायची झाल्यास यासाठी 44 लाख रुपये ते 52 लाख रुपये खर्च करावे लागतील. सेकंडहँड का होईना पण हा शेतकरी ऑडी A4 कारने भाजीची विक्री करतोय, हे पाहून शेतकरीवर्गाकडून त्याचे कौतुक केले जात आहे.