सार

Covid 19 Update : देशभरात कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून केंद्र सरकारकडून महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

Covid 19 Update : देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये करोनाचे 335 नवीन रुग्ण आढळले आहेत. केरळमध्येही कोरोना व्हायरसचे वाढते रुग्ण पाहता सरकारने नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना देत सतर्क राहण्यास सांगितले आहे.

तर कर्नाटक राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडू राव यांनी ज्येष्ठ नागरिक तसेच अन्य गंभीर आजारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना तोंडावर मास्क लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

कोव्हिड 19च्या नवीन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव 

जगभरात कोरोना व्हायरसच्या नवा व्हेरिएंटचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केरळ आणि कर्नाटक राज्यांमध्ये कोरोना व्हायरसबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर या राज्यांतील सरकारकडून खबरदारीची पावले उचलण्यात येत आहेत.

कर्नाटक राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडू राव यांनी ज्येष्ठ नागरिक तसेच अन्य गंभीर स्वरुपातील आजारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांना तोंडावर मास्क लावण्याचा सल्ला दिला आहे. पण नागरिकांनी घाबरण्याची गरज नसल्याचेही मंत्र्यांनी सांगितले. "कोरोना व्हायरसप्रकरणी आम्ही बैठक घेतली असून याप्रकरणी आता काय पावले उचलावीत, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. 

आम्ही लवकरच महत्त्वपूर्ण सूचना जारी करणार आहोत. तसेच 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठांनी व हृदयविकार आणि अन्य आजारांनी ग्रस्त असणाऱ्या रुग्णांनी तातडीने मास्क वापरण्यास सुरुवात करावी", अशी माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडू राव यांनी दिली आहे.

या भागांमध्ये आहे करोनाचे संकट

कर्नाटक राज्याचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले की, आम्ही सरकारी रुग्णालयांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. केरळसोबतच राज्याच्या सीमा क्षेत्राशी संपर्कात येणाऱ्या परिसरामध्ये अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. मंगळुरू, चमनजनगर आणि कोडागु ही ठिकाणे सीमा परिसरालगत येत असल्याने आम्ही वैद्यकीय चाचण्या वाढवण्यावर भर दिला आहे तसेच श्वासोच्छवासाच्या समस्या असणाऱ्या रुग्णांना चाचणी करणे बंधनकारक करावे लागेल".

आणखी वाचा :

इन्फ्लूएंझा किंवा सीझनल फ्लूची लक्षणे आढळल्यास काय करावे व काय करू नये?

Pneumonia Outbreak : चीनमध्ये नव्या महामारीचा धोका वाढतोय, महाराष्ट्रासह या राज्यांतही अ‍ॅलर्ट जारी

Pune Accident : पुण्यात वाहनांची धडक होऊन भीषण अपघात, आठ जणांचा मृत्यू