धक्कादायक! कानपुरमध्ये तरुणाची छेडछाड करत व्हायरल केले अश्लील व्हिडीओ, नक्की काय आहे प्रकरण वाचा सविस्तर....

| Published : May 08 2024, 08:23 AM IST / Updated: May 08 2024, 08:30 AM IST

iit kanpur

सार

Kanpur : कानपुरमध्ये एका अल्पवयीन मुलाची छेडछेडा करत त्याचे अश्लील व्हिडीओ तयार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याशिवाय पीडित मुलाचे चार व्हिडीओही व्हायरल केल्याचे सांगितले जातेय.

Kanpur : उत्तर प्रदेशातील कानपुर येथे पैशांसाठी एका अल्पवयीन मुलाची छेडछेडा केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य पाच जणांना शोध घेतला जातोय. वायूसेनेची तयारी करणाऱ्या कानपुरमधील विद्यार्थ्यासोबत अश्लील क्रृत्य केल्याने पीडित मुलाच्या कुटुंबाने त्याला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

आरोपींकडून 31 पैकी 4 अश्लील व्हिडीओ व्हायरल
कानपुरमधील काकादेव पोलीस स्थानकात पीडत तरुणाने सांगितले की, सहा दिवस आरोपींनी बेदम मारहणा केली. यानंतर 31 व्हिडीओ तयार केले. याशिवाय गुप्तांगावर वीट लावून त्याचेही व्हिडीओ तयार करत त्यामधील चार व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायल केले.

पीडित तरुणाने पुढे सांगितले की, ऑनलाइन गेम खेळण्यासाठी आरोपींनी त्याला 20 हजार रुपये दिले होते. गेममध्ये हरल्यानंतर आरोपींनी त्याच्याकडे दीड लाख रुपयांची मागणी केली होती. अशातच पैसे न दिल्याने आरोपींनी त्यांच्या खोलीत नेले.

जाळण्याची प्रयत्न करण्यात आला
पीडित तरुणाने म्हटले माझ्यासोबत अश्लील कृत्य करण्यासह बेदम मारहणा केलीच पण जाळण्याचाही प्रयत्न केला. यामध्ये केस जळले. याशिवाय आरोपींनी घरातील मंडळींना फोन करून त्यांच्याकडून दीड लाख रुपयांची मागणी केली असता त्यांनी पोलिसात धाव घेतली.

नातेवाईकांनी केली आरोपींचा एन्काउंटर करण्याची मागणी
पीडित मुलाने आपल्यासोबत घडलेला प्रकार वहिनीला सांगितला. यावर वहिनीचे असे म्हणणे आहे की, आरोपींनी मुलासोबत अत्यंत वाईट पद्धतीचे कृत्य केले आहे. यानंतर दीड लाख रुपयांचीही मागणी केली. आमच्या मुलाला अमानुषपणे मारण्यात आले आहे. अशातच परिवाराने मागणी केलीय की, आरोपींना तुरुंगात पाठण्याएवजी त्यांचा एन्काउंटर करावा. याशिवाय कुटुंबाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशातील पोलिसांकडे पीडित मुलाला न्याय मिळण्यासाठी मागणी केली आहे.

आणखी वाचा : 

मोठी बातमी ! बंगालमधील 25 हजारांहून अधिक शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ने दिली स्थगिती

'उच्च जातीने पेपर ठरवल्यास दलित परीक्षेत नापास होतात', राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानामुळे सोशल मीडियावरील युजर्स संतप्त (Watch Video)