'उच्च जातीने पेपर ठरवल्यास दलित परीक्षेत नापास होतात', राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानामुळे सोशल मीडियावरील युजर्स संतप्त (Watch Video)

| Published : May 07 2024, 09:02 AM IST / Updated: May 07 2024, 09:45 AM IST

Rahul Gandhi target Modi
'उच्च जातीने पेपर ठरवल्यास दलित परीक्षेत नापास होतात', राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानामुळे सोशल मीडियावरील युजर्स संतप्त (Watch Video)
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Rahul Gandhi Statment Viral Video : सोशल मीडियावर राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वरील मेघ अपडेट्सकडून शेअर करण्यात आला आहे.

Viral statement of Rahul Gandhi : स्पर्धा परीक्षांमध्ये वंचित वर्ग, अनसूचित वर्ग आणि उच्च जातींमध्ये भेदभाव केल्याचा आरोप लावणारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी काही नागरिकांशी संवाद साधताना संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करताना दिसून येत आहेत. राहुल गांधी म्हणतात की, उच्च जातीच्या नागरिकांनी परीक्षेसाठी पेपर ठरवल्यास दलित जातीमधील नागरिक नापास होतात. यासाठी अमेरिकेत कृष्णवर्णीयांसोबत केल्या जाणाऱ्या भेदभावाचे उदाहरण राहुल गांधींनी दिले. याच व्हिडीओवरून सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले आहे. काही युजर्सने राहुल गाधी समात द्वेष निर्माण करत असल्यात आरोप लावला आहे. 

 

राहुल गांधींनी नक्की काय म्हटलेय?
राहुल गांधींचा मेघ अपडेट्स नावाच्या अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी असे बोलताना दिसून येतात की, मेरिटचा निर्णय कोण घेतो? एक लहान गोष्ट सांगतो. एक उत्तम प्रयोग अमेरिकेत करण्यात आला. जसे आपल्याकडे आयआयटी असते तसेच अमेरिकेत उच्च परीक्षेला एसटी असे म्हटले जाते. ज्यावेळी एसएटी सर्वप्रथम लागू झाल्यास एक विचित्र बाब समोर आली. अमेरिकेतील सर्व श्वेतवर्णीय नागरिक परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे दिसून आले. पण कृष्णवर्णीय नापास झाले. याशिवाय जे स्पॅनिश भाषा बोलतात ते देखील उत्तम गुण परीक्षेत मिळवत नव्हते.

पुढे बोलताना राहुल गांधींनी म्हटले की, एका प्राध्यापकांनी असे केले श्वेतवर्णीय नागरिकांनी लिहिलेले पेपर कृष्णवर्णीयांकडून पुन्हा लिहून घेतले. यावेळी कृष्णवर्णीय पास झाले. अशातच गोऱ्या रंगातील नागरिक नापास झाले. म्हणजेच व्यवस्थेवर नियंत्रण मिळवणाराच मेरिट ठरवतो.

आणखी वाचा :

अरविंद केजरीवाल यांच्यावर खलिस्तानी निधी घेतल्याचा आरोप, नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी एनआयएकडे तपासाची केली शिफारस

झारखंडमध्ये मंत्र्यांच्या सचिवाकडील नोकराच्या घरावर ईडीची कारवाई, सापडले कोट्यावधींच्या नोटांचे घबाड (Watch Video)