- Home
- India
- जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे भूस्खलन, 31 यात्रेकरूंचा मृत्यू, वैष्णोदेवी यात्रा थांबवली
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे भूस्खलन, 31 यात्रेकरूंचा मृत्यू, वैष्णोदेवी यात्रा थांबवली
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या २४ तासांत पावसामुळे आणि भूस्खलनामुळे ३५ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये केवळ वैष्णोदेवी मंदिराच्या मार्गावर झालेल्या भूस्खलनात ३१ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

३१ जणांचा मृत्यू, यात्रा थांबवली
तापी आणि चेनाब नद्यांमध्ये पाण्याची पातळी धोक्याच्या वर गेली आहे. तवी नदीवरील पुलाचा एक भाग कोसळला असून, अडकलेले ३,५०० पेक्षा जास्त लोक वाचवण्यात आले आहेत. मुसळधार पावसामुळे रस्ते व रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. वैष्णोदेवी मंदिराकडे जाणारा रस्ता व पूल नुकसानग्रस्त झाले असून, वीजवाहिन्या व मोबाईल टॉवर्सदेखील पडले आहेत.
मदत व बचावकार्य सुरू
सैन्य, NDRF (राष्ट्रीय आपत्ती दल), SDRF (राज्य आपत्ती दल), जम्मू पोलीस आणि मंदिर प्रशासन एकत्रितपणे मदतकार्य करत आहेत. वैष्णोदेवी यात्रा सध्या थांबवण्यात आली असून, पुढील आदेश येईपर्यंत यात्रेकरूंनी प्रवास करू नये, असे प्रशासनाने सांगितले आहे.
रेल्वे सेवा बंद, १८ गाड्या रद्द
जम्मू-काश्मीरमधील सक्की नदीला आलेल्या पूरामुळे पठाणकोट कॅंट–कांद्रोरी दरम्यान रेल्वेमार्ग धोक्यात आला. त्यामुळे १८ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
गृहमंत्री अमित शहा यांची प्रतिक्रिया
मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेला “अत्यंत दुर्दैवी” म्हटलं. त्यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी चर्चा केली. जखमींना मदत करण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके काम करत आहेत, तसेच NDRFची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे, असं त्यांनी सांगितलं.

