IT Jobs: आयटीमध्ये पॅकेजची बूम, 2025 मधील पासआऊट फ्रेशर्सना 21 लाखांची ऑफर!
IT Jobs: भारतीय आयटी क्षेत्रात, इन्फोसिसने आपल्या 'AI First' योजनेअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कौशल्ये शिकलेल्या इंजिनिअरिंग पदवीधरांना वार्षिक 21 लाख रुपयांपर्यंतचे सुरुवातीचे वेतन देण्याची घोषणा केली आहे. यामुळे तरूणांमध्ये उत्साह पसरला आहे.

आयटी क्षेत्रात पुन्हा एकदा पॅकेजची बूम
भारतीय आयटी क्षेत्रातील कमी पगाराची चिंता दूर करत इन्फोसिसने मोठी घोषणा केली आहे. AI कौशल्ये असलेल्या इंजिनिअर्सना वार्षिक 21 लाखांपर्यंत पगार दिला जाणार आहे. यामुळे तरुणांमध्ये उत्साह आहे.
अविश्वसनीय पगाराची ऑफर!
गेल्या 10 वर्षांत सीईओंचा पगार 800% वाढला, पण फ्रेशर्सचा नाही. ही दरी कमी करण्यासाठी इन्फोसिसने स्पेशालिस्ट प्रोग्रामरसाठी L3 स्तरावर 21 लाख, L2 साठी 16 लाख आणि L1 साठी 11 लाख वार्षिक पगार जाहीर केला आहे.
इन्फोसिसचे 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देण्याचे लक्ष्य
या आर्थिक वर्षात इन्फोसिस 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार आहे. 12 हजार उमेदवारांची निवड झाली असून, उर्वरित जागा लवकरच ऑफ-कॅम्पस भरतीद्वारे भरल्या जातील. BE, B.Tech, MCA आणि MSc पदवीधर अर्ज करू शकतात.
तरुणांसाठी ही एक जॅकपॉट संधी आहे
आयटी क्षेत्रातील स्पर्धेत हुशार तरुणांना आकर्षित करण्यासाठी इन्फोसिसचा हा निर्णय महत्त्वाचा आहे. डिजिटल स्पेशालिस्ट इंजिनिअर पदासाठी किमान 7 लाखांपासून पगार सुरू होत आहे. ही तरुणांसाठी एक मोठी संधी आहे.

