- Home
- Maharashtra
- पुणे-बंगळुरू विसरा! देशातील 'तिसरं' IT हब महाराष्ट्रात 'या' शहरात फायनल, लाखो नोकऱ्यांची डेडलाईन ठरली; आत्ताच वाचा!
पुणे-बंगळुरू विसरा! देशातील 'तिसरं' IT हब महाराष्ट्रात 'या' शहरात फायनल, लाखो नोकऱ्यांची डेडलाईन ठरली; आत्ताच वाचा!
Solapur IT Park Project : बेंगळुरू आणि पुण्यानंतर आता सोलापुरात देशातील तिसरे सर्वात मोठे आयटी पार्क उभारले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जागा निश्चित झाली असून, यामुळे 45 हजारांहून अधिक रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

देशातील 'तिसरं' IT हब महाराष्ट्रात 'या' शहरात फायनल
मुंबई: बेंगळुरू आणि पुण्यानंतर देशातील तिसरं सर्वात मोठं IT पार्क आता महाराष्ट्रात उभं राहणार आहे. राज्यातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जागा निश्चित झाली असून, काम सुरू होण्याची अंतिम वेळाही जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे या प्रकल्पाला गती मिळाली असून सोलापूरच्या विकासातील हा निर्णायक टप्पा मानला जात आहे.
सोलापुरात IT पार्क उभारणीचा मार्ग मोकळा
पुण्यातील हिंजवडी IT पार्कनंतर राज्यातील हे दुसरं सर्वात मोठं IT पार्क असणार आहे. सीमाभागातील प्रमुख शहर सोलापुरात IT पार्क उभं राहिल्यानं, केवळ पुण्यावरील आयटी क्षेत्राचा ताण कमी होणार नसून, मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीलाही चालना मिळणार आहे.
तीन महिन्यांपूर्वी फडणवीस यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना IT पार्कसाठी योग्य जागेचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर झालेल्या प्रक्रियेनुसार जलसंपदा विभागाच्या मालकीची सुमारे 50 एकर जागा या प्रकल्पासाठी योग्य ठरली असून आता ही जमीन औपचारिकरित्या MIDC कडे हस्तांतरित करण्यात आली आहे.
38 कोटींचा प्रस्ताव, उंच इमारतीस मंजुरी
IT पार्कसाठी आवश्यक पायाभूत सुविधांसाठी
रस्ते, पाणीपुरवठा, पथदिवे आणि इतर मूलभूत सोयी
राज्य सरकारकडे अंदाजे 38 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
सोलापुरातील होटगी रोड परिसरातील 50 मीटरपर्यंत उंच इमारती उभारण्यास विमानतळ प्रशासनाने हिरवा कंदील दिल्याने, उड्डाण मार्गात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.
दीड वर्षात काम पूर्ण, 45 हजारांहून अधिक रोजगार
नव्या IT पार्कचं काम सुमारे दीड वर्षांत पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर येथे 45 हजारांपेक्षा जास्त आयटी कर्मचारी कार्यरत राहू शकणार आहेत. त्यामुळे सोलापुराच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल.
राज्यातील IT क्षेत्राला नवी दिशा
सध्या पुण्यातील हिंजवडी IT पार्क महाराष्ट्रातील सर्वात मोठं आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचं IT पार्क म्हणून ओळखलं जातं. यानंतर सोलापूरचं IT पार्क उभारल्याने राज्याच्या तांत्रिक प्रगतीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे. नव्या रोजगार संधी, उद्योगधंद्यांना चालना आणि सोलापूरच्या ओळखीत भर या प्रकल्पामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही थेट फायदा होणार आहे.

