Interim Budget 2024 : देशाचे भविष्य घडविणारा यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प, वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले

| Published : Feb 01 2024, 03:11 PM IST / Updated: Feb 01 2024, 11:31 PM IST

PM Narendra Modi

सार

आज संसेदत अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधानांनी म्हटले की, यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प देशाचे भविष्य घडविणारा आहे.

PM Modi on Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज (1 फेब्रुवारी) संसदेत सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधांनी म्हटले की, “आज सादर करण्यात आलेला अंतरिम अर्थसंकल्प विकसित भारताचे चार स्तंभ- तरुण, महिला, शेतकरी आणि गरिबांना सक्षम करणारा आहे. अंतरिम अर्थसंकल्प देशाचे भविष्य घडविणारा आहे. या अंतरिम अर्थसंकल्पात वर्ष 2047 च्या विकसित भारताचा पाया मजबूत होईल अशी अपेक्षा आहे.”

पुढे पंतप्रधानांनी म्हटले की, या अंतरिम अर्थसंकल्पात दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. संशोधन आणि नवोपक्रमांवर एक लाख कोटी रूपयांचा निधी निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. स्टार्टअपला मिळणाऱ्या टॅक्स सूटबद्दलही घोषणा केली आहे.

भांडवल खर्चाबद्दल काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले की, "यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात वित्तीय तूट नियंत्रणात ठेवताना भांडवली खर्चाला 11 लाख 11 हजार 111 कोटी रूपयांचा ऐतिहासिक उच्चांक देण्यात आला आहे. यामुळे भारताच्या 21व्या शतकातील आधुनिक पायाभूत सुविधेसह तरुणांसाठी रोजगारांच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहे.

तीन कोटी महिला होणार लक्षाधीश
गरिबांसाठी आम्ही गाव आणि शहरांमध्ये चार कोटींहून अधिक घर बांधली. आणखी दोन कोटी घरे उभारली जाणार असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले. याशिवाय दोन कोटी महिलांना लक्षाधीश करण्याचे लक्ष्य ठरविले होते. पण आता तीन कोटी महिलांना लक्षाधीश बनवणार असल्याचे आमचे लक्ष्य आहे.

'आयुष्मान भारत योजने'अंतर्गत गरिबांची फार मोठी मदत झाली आहे. आता आंगणवाडी सेविका आणि आशा भगिनींना देखील आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प गरीब आणि मध्यम वर्गाला सक्षम करण्यासाठी, उत्पन्नाच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारा असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : 

Budget 2024 Highlights : अंतरिम अर्थसंकल्पात तरुण वर्ग, महिलांसह शेतकऱ्यांबद्दल केल्यात या घोषणा, जाणून घ्या एका क्लिकवर

Budget 2024 : सात लाख रूपयांच्या उत्पन्नावर कर द्यावा लागणार नाही, वाचा अंतरिम अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारमण यांनी केलेल्या घोषणेबद्दल सविस्तर

Interim Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी टॅक्स स्लॅबबद्दलच्या केलेल्या घोषणेनंतर नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया

Read more Articles on