सार
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला. यावेळी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नसल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे.
Social Media Users Reaction Over Tax Slab : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज (1 फेब्रुवारी) संसदेत देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थमंत्र्यांनीपंतप्रधान आवास योजना, मोफत वीज सेवा, आंगणवाडी, रेल्वे कॉरिडोरसह टॅक्स स्लॅबबद्दल घोषणा केली.
निर्मला सीतारमण यांनी टॅक्स स्लॅबमध्ये (Tax Slab) कोणताही बदल करण्यात येणार नसल्याची घोषणा अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर करताना केली. यावरच आता सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केल्या आहेत.
सात लाख उत्पन्न असणाऱ्यांना कर द्यावा लागणार नाही- निर्मला सीतारमण
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना म्हटले की, टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही. पण सात लाख रूपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कर भरावा लागणार नाही असेही निर्मला सीतारमण यांनी म्हटले. यावरुनच आता सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर टॅक्स स्लॅबबद्दलच्या निर्मला सितारमण यांच्या घोषणेनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
10 वर्षात तिप्पट टॅक्स कलेक्शनमध्ये वाढ- निर्मला सीतारमण
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना म्हटले की, वित्तीय तूट 5.1 टक्के राहण्याचा अंदाज आहे. 44.90 कोटी रूपये खर्च करण्यात आले असून 30 लाख कोटी रूपयांचा महसूल येणाच्या अंदाज आहे. याशिवाय 10 वर्षात इनकम टॅक्स कलेक्शन तिप्पट वाढले आहे.
आणखी वाचा :