Budget 2024 Highlights : अंतरिम अर्थसंकल्पात तरुण वर्ग, महिलांसह शेतकऱ्यांबद्दल केल्यात या घोषणा, जाणून घ्या एका क्लिकवर

| Published : Feb 01 2024, 01:19 PM IST / Updated: Feb 01 2024, 01:26 PM IST

Budget 2024 Highlights

सार

गुरुवारी (1 फेब्रुवारी) देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मोदी सरकारच्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प असल्याने याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून होते. अंतरिम अर्थसंकल्पात महिला, शेतकऱ्यांसह तरुण वर्गांकडे खास लक्ष देण्यात आले आहे. 

Interim Budget 2024 Highlights : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी 1 फेब्रुवारीला देशाचा अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यादरम्यान, 57 मिनिटांच्या अर्थसंकल्पाच्या भाषणात निर्मला सीतारमण आरोग्य विभागाव्यतिरिक्त तरुण वर्ग, महिला, गरीब, शेतकरऱ्यांच्या मुद्द्यांवर बोलल्या. याशिवाय यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नसल्याची घोषणाही निर्मला सीतारमण यांनी केली. पण गरीबासंदर्भातील पंतप्रधान आवास योजनेवर (Pradhan Mantri Awas Yojana) खास जोर देण्याचा निर्मला सीतारमण यांनी प्रयत्न केला.

अंतरिम अर्थसंकल्पाबद्दलच्या खास गोष्टी

  • तीन कोटी महिलांना लखपती केले
  • पुढील पाच वर्षात गरीबांसाठी दोन कोटी घर उभारली जाणार
  • सात नवे IIT आणि सात नवे IIM ची सुरुवात केली जाणार
  • सरव्हायकल कॅन्सर (Cervical Cancer) रोखण्यासाठी नऊ वर्ष ते 14 वयोगटातील मुलींचे लसीकरण केले जाईल
  • मिशन इंद्रधनुष्यअंतर्गत मुलींचे लसीकरण वाढवण्यात येणार
  • तीन रेल्वे कॉरिडोअर सुरू केले जाणार
  • रेल्वे प्रवासासंदर्भात सुविधा वाढवल्या जाणार
  • लक्षद्वीपसाठी खास योजना तयार करण्यात येणार
  • 10 वर्षांपर्यंत 10 हजारांचा टॅक्स माफ केला जाणार
  • विमानतळांची संख्या वाढून 149 झाली आहे
  • वंदे भारतच्या धर्तीवर 40 हजार रेल्वे बोगी बनवल्या जाणार
  • टॅक्स स्लॅबमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही
  • दरम्यान, सात लाख रूपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स भरावा लागणार नाही
  • शेतीसाठी NANO डॅपचा वापर केला जाईल
  • आशा भगिनींनाही आयुष्मान योजनेचा लाभ घेता येईल
  • प्रत्येक महिन्याला 300 युनिट मोफत वीज दिली जाणार
  • इलेक्ट्रिक गाड्यांसंदर्भात सरकार खास प्लॅन तयार करणार

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अंतरिम अर्थसंकल्पाचा वाचनाला सुरुवात केल्यानंतर म्हटले की, देशाची जनता भविष्याच्या दिशेने पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वात आम्ही पुढे जात आहोत. पंतप्रधानांनी वर्ष 2014 मध्ये काम सुरू केले होते, त्यावेळी खूप आव्हानांचा सामना करावा लागला होता. जनेतेच्या हितासाठी काम सुरू करण्यात आले होते. जनतेला अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.

आणखी वाचा : 

Budget 2024 : सात लाख रूपयांच्या उत्पन्नावर कर द्यावा लागणार नाही, वाचा अंतरिम अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारमण यांनी केलेल्या घोषणेबद्दल सविस्तर

Interim Budget 2024: पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी लक्षद्वीपसह अन्य बेटांकरिता मोठी गुंतवणूक - निर्मला सीतारमण

अंतरिम अर्थसंकल्पाआधी आनंदाची बातमी ! नऊ महिन्यात क्रेडिट फ्लो 1.6 पटीने वाढला, जाणून घ्या कोणत्या क्षेत्रात किती झाली वाढ

Read more Articles on