BJP कडून लोकसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर होणार, दिग्गज नेत्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता

| Published : Mar 19 2024, 08:00 AM IST / Updated: Mar 19 2024, 08:03 AM IST

bjp
BJP कडून लोकसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर होणार, दिग्गज नेत्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापर्यंत 267 जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. तिसरी यादी मंगळवारी (19 मार्च) जारी केली जाणार आहे.

Lok Sabha Elections 2024 :  भाजप (BJP) पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. याआधी पक्षाकडून 267 जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. अशातच मंगळवारी (19 मार्च) भाजपकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली जाणार आहे.

सोमवारी (18 मार्च) पक्षाच्या मुख्यालयात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, हरियाणा, ओडिशा, सिक्कीम, महाराष्ट्र आणि गुजरात येथील लोकसभेच्या उमेदवारांच्या नावासंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीवेळी भाजपच्या कोट्यातील 25 जागांवर उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली. रायबरेली येथून यंदा मेनका गांधी यांना पक्षाकडून तिकिट दिले जाऊ शकते. दुसऱ्या बाजूला कैसरगंज जागेवरून बृजभूषण शरण सिंह यांचा पत्ता कट होऊ शकतो. वरुण गांधी आणि बरेली येथून संतोष गंगावर यांचे देखील पक्षाकडून तिकिट कापले जाऊ शकते. उत्तर प्रदेशात सर्वाधिक 80 लोकसभा जागा आहेत. भाजपने उत्तर प्रदेशातील सर्व जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

तिसऱ्या यादीत कोणाला मिळणार संधी?
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हरियाणातील तीन जागांवर चर्चा झाली. सूत्रांनुसार, भाजप सोनीपत येथून यंदा योगेश्वर दत्त यांना संधी देऊ शकते. सोनीपत जागेवरून अभिनेता रणदीप हुड्डाला निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली होती. पण अभिनेत्याने निवडणूक लढवण्यास नकार दिला. याशिवाय कुरूक्षेत्र येथून भाजप कांग्रेसचे माजी खासदार नवीन जिंदल यांच्या पत्नी शालू जिंलद यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकतात.

या दिग्गज नेत्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता
उत्तर प्रदेशात भाजपचे नेते आणि खासदार वरुण गांधी, रीता बहुगुणा जोशी, बृजभूषण शरण सिंह, जनरल वीके सिंग, संतोष गंगावर, रमापति राम त्रिपाठीस संघमित्रा मौर्या आणि सत्येदेव पचौरी यांचा पत्ता कट होऊ शकतो.

भाजपची तिसरी यादी तयार
भाजपने आपल्या पहिल्या यादीत उत्तर प्रदेशातील 51 जागांवर उमेदवारांची घोषणा केली होती. पश्चिम बंगालमधील 20 जागा, राजस्थानमधील 15 जागांवर उमेदवारांची नावे जाहीर केली होती. दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20, हरियाणा येथून सहा उमेदवारांच्या नावाची घोषणा भाजपने केली होती.

पक्षाने पहिल्या यादीत गुजरात येथून 15 जागांवर आणि दुसऱ्या यादीत सात उमेदावारांच्या नावाची घोषणा केल होती. या राज्यामधील शिल्लक राहिलेल्या जागांवरील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब व्हायचे बाकी आहे. ओडिशा बद्दल बोलायचे झाल्यास, या राज्यात बीजू जनता दलासोबत युतीसंदर्भात अद्याप चर्चा सुरू आहे.

आणखी वाचा : 

लोकसभा निवडणुकीआधी राज ठाकरे दिल्लीत दाखल, NDA मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांना उधाण

ईडीकडून काँग्रेसमधील दिग्गज नेत्याची चौकशी केली जाणार, 20 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंबंधित प्रकरण

Loksabha Election : NDA चे बिहारमध्ये झाले जागावाटप, भाजप 17 आणि नितीश कुमार 16 जागा लढवणार

Read more Articles on