देशाच्या गृहमंत्र्यांनी CAA संदर्भात दिले संकेत, कारच्या नंबर प्लेटमुळे अमित शाहांबद्दल चर्चा (See Viral Photos)

| Published : Mar 01 2024, 02:51 PM IST / Updated: Mar 01 2024, 04:08 PM IST

amit shah Car

सार

डिसेंबर 2019 मध्ये संसदेत मंजूर झालेला नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यात आलेला नाही. कायद्याला मंजूरी मिळाल्यानंतर देशभरात आंदोलने सुरू झाली होती.

Amit Shah CAA Number Plate Car : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कारचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अमित शाह DL1C AA 4421 नंबर प्लेट असणाऱ्या कारमध्ये बसून भाजपच्या मुख्यालयात दाखल होताना दिसून येत आहे.

केंद्रीय गृहमंत्री आणि सीएए नंबर प्लेट असणाऱ्या गाडीची चर्चा आता अशावेळी सुरू झालीय की, गेल्या काही दिवसांपूर्वीच अमित शाहांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) आचारसंहिता लागू होण्याआधी देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू करण्याचे संकेत दिले होते. दरम्यान, आदर्श आचार संहिता (MCC) निवडणुकीच्या घोषणेनंतर लगेच लागू केली जाते. यामुळे मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात आदर्श आचार संहिता लागू होण्याची शक्यता आहे.

डिसेंबर, 2019 मध्ये संसेदत सीएएला मंजूरी देण्यात आली होती. पण अद्याप सीएए देशात लागू करण्यात आलेला नाही. या कायद्याला मंजूरी मिळाल्यानंतर देशभरात आंदोलने सुरू झाली होती. कारण कायद्याचा विरोध करणाऱ्यांनी सीएएला धर्माच्या आधावर भेदभाव केल्यासारखे असल्याचे म्हटले होते.

या देशातील नागरिकांना मिळू शकते नागरिकत्व
वर्ष 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने नागरिकत्व कायद्यात सुधारणा केली होती. यामध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेश येथील 31 डिसेंबर, 2014 आधी येणाऱ्या सहा अल्पसंख्यांकांना (हिंदू, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध आणि पारसी) भारताचे नागरिकत्व देण्याची तरदूत आहे. नियमांनुसार, नागरिकत्व देण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे आहेत.

आणखी वाचा :

Lok Sabha Election 2024 : 20 कोटी नवीन मतदारांसाठी 'माझे पहिले मत देशासाठी' मोहीम झाली सुरु

Lok Sabha Polls : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुसंदर्भात महत्त्वाची बैठक, 100 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांची भेट, सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत म्हणाले…