झारखंडमध्ये पुन्हा एकदा सापडली लाखो रुपयांची रोकड, कारमधील पैसे मोजण्यासाठी बोलवावी लागली IT टीम

| Published : May 09 2024, 07:48 AM IST / Updated: May 09 2024, 07:54 AM IST

Cash Limit at Home
झारखंडमध्ये पुन्हा एकदा सापडली लाखो रुपयांची रोकड, कारमधील पैसे मोजण्यासाठी बोलवावी लागली IT टीम
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Jharkhand : ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात झारखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रोकड सापडत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशातच पुन्हा एकदा एका कारमध्ये लाखो रुपयांची रोकड सापडल्याची बाब समोर आली आहे.

Jharkhand News : झारखंडमधील रामगड येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, रांची येथून हजारीबादच्या दिशेने जाणाऱ्या एका इनोवा कारमधून 45 लाख 90 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. रामगड-रांची एनएच-33 फोरलेन येथील खेता टोल प्लाजाजवळ तयार करण्यात आलेल्या चेक पोस्टजवळ एसएसटीच्या टीमने रांची येथून हजारीबागच्या दिशेने जाणाऱ्या इनोवा कारमधून रोकड जप्त केली आहे. कारमध्ये असलेल्या दोघांना सध्या ताब्यात घेण्यात आले आहे.

इन्कम टॅक्स विभाग करणार हस्तक्षेप
इनोवा कारमध्ये सापडलेल्या रोकडनंतर त्याच्या मोजणीसाठी इन्कम टॅक्स विभागाला सूचना देण्यात आली. कारमधील व्यक्तींकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रेही सापडेलेली नाहीत. पण ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांनी म्हटले की, लाखो रुपयांची रोकड व्यवसायासाठी नेण्यात येत होती. पण व्यावसायासंबंधितही कोणती कागदपत्रे दोघांकडे नाहीत. रामड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीमुळे आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे.

कारमध्ये सापडलेल्या नोटांच्या घबाडामुळे आता वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. सध्या जप्त करण्यात आलेली रोकड कुठे वापरली जाणार होती याचा तपास केला जातोय. खरंतर, ऐन निवडणुकीच्या काळात सातत्याने झारखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून नोटांचे घबाड सापडत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक
ईडीच्या टीमला 6 मे ला ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम (Alamgir Alam) यांचा खासगी सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरात 35.23 कोटी रुपयांची रोकड सापडली होती. आता या प्रकरणात आलमगीर आलम आणि जहांगीर आलम यांना ईडी अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

काळा पैसा असल्याचा ईडीला संशय
नोकराच्या घरात सापडलेली रक्कम काळा पैसा असल्याचा ईडीला (ED)संशय आहे. खरंतर, ईडीकडून 10 हजार रुपयांच्या लाच प्रकरणात तपास करत होती. याच दरम्यान काही गोष्टी अशा उलगडल्या की, त्याचे थेट कनेक्शन मंत्र्यांसोबत असल्याचे समोर आले. ईडीला मिळालेल्या माहितीनुसार, आलमगीर आलम यांच्या मंत्रालयात भ्रष्टाचार सुरू होता आणि त्यामधून जमा होणारी रोकड नोकरदारांच्या घरी ठेवली जात होती. यानंतर ईडीने आलमगीर यांच्या खासगी सचिवाकडील नोकराच्या घरावर छापेमारी केली. त्यावेळी नोकराच्या घरात नोटांचे घबाड ठेवल्याचे ईडीला दिसून आले.

आणखी वाचा : 

काँग्रेस पक्षाने गरिबांसाठी काहीच काम केले नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर केली टीका

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये चकमक, लष्कर-ए-तैयबाच्या कमांडरसह तीन दहशतवादी ठार

Read more Articles on