- Home
- India
- Vote Chori Protest: INDIA आघाडीच्या आंदोलनातील ५ फोटो, जमिनीवर प्रियंका गांधी; बॅरिकेडवर अखिलेश यादव यांची उडी
Vote Chori Protest: INDIA आघाडीच्या आंदोलनातील ५ फोटो, जमिनीवर प्रियंका गांधी; बॅरिकेडवर अखिलेश यादव यांची उडी
Vote Chori Protest: INDIA आघाडीतील ३०० खासदारांनी दिल्लीतील निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन केले. प्रियंका गांधी जमिनीवर बसल्या, अखिलेश यादव बॅरिकेडवर चढले, तर राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

दिल्ली : लोकसभा निवडणुकांमध्ये "मतांची चोरी" झाल्याच्या आरोपावरून INDIA आघाडीतील जवळपास ३०० खासदारांनी दिल्लीतील निवडणूक आयोगाविरोधात जोरदार आंदोलन केलं. यावेळी प्रियंका गांधी जमिनीवर बसल्या, अखिलेश यादव बॅरिकेडवर चढले, तर राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
1. बॅरिकेडवर चढून घोषणा, जमिनीवर आंदोलन
सोमवारी विरोधी पक्षांच्या खासदारांनी निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मार्च काढला. मात्र, दिल्ली पोलिसांनी हा मार्च मध्येच थांबवला. त्यानंतर अखिलेश यादव, महुआ मोइत्रा, सुष्मिता देव, संजना जाटव, आणि जोतिमणि यांसारख्या नेत्यांनी बॅरिकेड्स चढून घोषणाबाजी सुरू केली.
2. पोलिसांनी रोखल्यावर जमिनीवर बसले खासदार
मोर्चा संसद भवनाजवळून सुरू झाला होता आणि तो निर्वाचन सदन (Election Commission Headquarters) कडे जात होता. पोलिसांनी ते अडवले असता विरोधी खासदार रस्त्यावरच बसले आणि "मतांची चोरी बंद करा", "लोकशाहीचा अपमान थांबवा" अशा घोषणा देत आंदोलन सुरू ठेवलं. प्रियंका गांधी जमिनीवर बसून शांततापूर्ण विरोध करत होत्या.
3. महुआ मोइत्रा आणि मिताली बाघ आंदोलना दरम्यान बेशुद्ध
मोर्चा, ढकलाढकी, घोषणाबाजी आणि गोंधळादरम्यान तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा आणि मिताली बाघ बेशुद्ध पडल्या. उपस्थित सहकाऱ्यांनी त्यांना पाणी देऊन शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. मिताली बाघ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
4. राहुल गांधींसह अनेक नेते ताब्यात
या आंदोलनादरम्यान राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे, जयराम रमेश आणि अन्य विरोधी खासदारांना पोलीसांनी ताब्यात घेतलं. ही कारवाई मार्चमध्ये अडथळा आणल्यामुळे करण्यात आली.
5. "ही लढाई राजकीय नाही, संविधानाची आहे" – राहुल गांधी
हिरासत घेतल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, "ही लढाई कोणत्याही पक्षाविरोधात नाही. ही लढाई आहे संविधान वाचवण्याची. सत्य देशासमोर उघड आहे."
या आंदोलनात टी. आर. बालू (डीएमके), संजय राऊत (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे), डेरेक ओ'ब्रायन (टीएमसी), प्रियंका गांधी, अखिलेश यादव, तसेच डीएमके, आरजेडी, वामपंथी पक्ष आणि इतर विरोधी खासदार सहभागी झाले होते. हे आंदोलन मुख्यतः बिहारमधील मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन आणि 2024 लोकसभा निवडणुकांतील मतदार फसवणुकीच्या आरोपांवरून करण्यात आलं.

