
Waris Pathan यांचा ‘धुरंधर 2’वर हल्ला
Waris Pathan यांनी ‘Dhurandhar Part 2’ या चित्रपटावर आणि Kangana Ranaut यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.चित्रपटांद्वारे समाजात द्वेष पसरवला जात असल्याचा आरोप करत त्यांनी अशा कथित प्रोपगंडा चित्रपटांवर टीका केली. काही चित्रपटांमध्ये मुस्लिम समाजाविरुद्ध चुकीचे चित्रण केले जात असल्याचे त्यांनी म्हटले.तसेच अशा प्रकारच्या कंटेंटवर सरकारने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.कंगना रनौत यांच्या वक्तव्यांवरही त्यांनी भाष्य करत त्यांच्या भाषेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.