आता लढाई राजकीय लढाई लोकसभेच्या पटलावर...सोनिया गांधींचा NDA आघाडीला थेट इशारा

| Published : Jun 06 2024, 09:02 AM IST / Updated: Jun 06 2024, 09:05 AM IST

sonia gandhi, kharge

सार

इंडिया आघाडीकडून सत्ता स्थापन करण्याचा दावा केला जाणार नाही यासंदर्भात नुकतीच दिल्लीत एक बैठक पार पडली. अशातच सोनिया गांधी यांनी म्हटले की, लोकशाहीत सत्ता नंबर्सच्या आधारावर मिळते.

India Alliance Meeting: केंद्रात तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकार स्थापन होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. बुधवारी (5 जून) झालेल्या एनडीएच्या बैठकीत सर्व मित्रपक्षांनी नरेंद्र मोदींना सत्ताधारी आघाडीचे नेते म्हणून निवड केली आहे. अशातच इंडिया आघाडीची देखील बैठक ढाली. यासाठी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव प्रियांका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे नेते देखील उपस्थितीत होते. याच वेळी सोनिया गांधी यांनी केलेले एक विधान चर्चेत आले आहे.

सोनिया गांधींचे विधान चर्चेत
काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत 99 जागांवर विजय मिळवता आहे. इंडिया आघाडीचा एकूण 234 जागांवर विजय झाला आहे. यानंतर अशा बातम्या आल्या होत्या की, इंडिया आघाडी दिल्लीच्या गादीवर विराजमान होऊ शकते. सूत्रांनुसार सोनिया गांधींनी (Sonia Gandhi) म्हटलेय की, "लोकशाहीत सत्ता नंबर्सच्या आधारावर मिळते. जनादेशानंतर सर्वांनी एकमताने ठरवले की, आम्ही सरकार स्थापनेचा दावा करणार नाही. अशातच आता लढाई लोकसभेच्या पटलावर होईल."

राहुल गांधींनी काय म्हटले?
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी म्हटले की, आम्हाला जनतेमध्ये फ्रंटफुटला राहायचे आहे. आम्ही दिलेली आश्वासने दिली ती सत्ता आल्यानंतर पूर्ण करू. ही स्थिती अशीच कायम ठेवा. ज्या मुद्द्यांवर भाजपचा 370 पासचा नारा आणि एनडीएचा 400 पासचा नारा उद्ध्वस्त झाला त्याच मुद्द्यांवर मोदींविरुद्धची लढाई सुरू राहिली पाहिजे. याशिवाय काँग्रेस हायकमांडने अमेठीच्या केएल शर्मा यांच्यासह अनेक नवनिर्वाचित खासदारांची भेट घेतली.

मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले?
इंडिया आघाडीच्या पुढील रणनितीसंदर्भात दिल्लीत बैठक झाली. आघाडीच्या प्रमुख पक्षांमधील 33 नेत्यांनी बैठकीला उपस्थिती लावली होती. सर्व मित्रपक्षांच्या बैठकीनंतर इंडिया आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही असा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी म्हटले की, हा जनादेश भारताच्या संविधानच्या संरक्षणासाठी, महागाई, बेरोजगारीच्या विरोधासाठी आहे. इंडिया आघाडी हुकूमशाही शासनाच्या विरोधात लढत राहिल.

इंडिया आघाडीचे ट्विट
इंडिया आघाडीच्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वरुन एक ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटमध्ये 'Game Not Over Wait' असे लिहिण्यात आले आहे. यामुळे इंडिया आघाडीच्या ट्विटची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. इंडिया आघाडी मोठा डाव खेळणार का अशा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

आणखी वाचा : 

Swearing-In Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या सोहळ्याची जंगी तयारी, शेजारील देशांतील 'या' नेत्यांना पाठवले आमंत्रण

लोकसभा निवडणुकीतच नाही तर गुगल सर्चिंगमध्येही राहुलची पडली छाप, जाणून घ्या कुठे आहेत