Swearing-In Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या सोहळ्याची जंगी तयारी, शेजारील देशांतील 'या' नेत्यांना पाठवले आमंत्रण

| Published : Jun 06 2024, 08:26 AM IST / Updated: Jun 06 2024, 08:29 AM IST

nda meeting elects narendra modi 12
Swearing-In Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या सोहळ्याची जंगी तयारी, शेजारील देशांतील 'या' नेत्यांना पाठवले आमंत्रण
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 8 जूनला पुन्हा एकदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. अशातच शपथविधीच्या सोहळ्याची जंगी तयारी सुरु करण्यात आली आहे. शपथविधी सोहळ्याला श्रीलंका आणि बांग्लादेशासह काही शेजारील देशातील प्रमुख नेत्यांना आमंत्रण पाठवले आहे. 

Swearing-In Ceremony : येत्या 8 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यासाठी श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना आमंत्रण पाठवले आहे. अशातच शेख हसीना आणि रानिल विक्रमसिंघे यांनी पंतप्रधानांकडून शपथविधी सोहळ्याचे पाठवण्यात आलेले आमंत्रण स्विकारले आहे.

दरम्यान, 4 जूनला 18व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यामध्ये एनडीएला निवडणुकीत 293 जागांवर विजय मिळवता आला. यानंतर नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. सध्या नव्या सरकारच्या शपथविथी सोहळ्यापर्यंत नरेंद्र मोदी काळजीवाहून पंतप्रधान पद सांभाळणार आहेत.

या देशांना पाठवण्यात आलेय आमंत्रण
रिपोर्ट्सनुसार, नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला श्रीलंका आणि बांग्लादेशाव्यतिरिक्त नेपाळ, मॉरिशसचे पंतप्रधान, श्रीलंकेचे राष्ट्रपती आणि भूतानच्या राजाला देखील शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण पाठवण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी शपथविधी सोहळ्याला नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहाल, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांना देखील आमंत्रित केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर एनडीला मिळालेल्या विजयानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो, ब्रिटेनचे पंतप्रधान ऋषी सुनक, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी,युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीसह 75हून अधिक नेत्यांनी नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

नरेंद्र मोदींची सत्ताधारी आघाडीचे नेते म्हणून निवड
भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या नेत्यांनी 5 जूनला एकमताने नरेंद्र मोदी यांची सत्ताधारी आघाडीचा नेता म्हणून निवड केली. गरीब, महिला, तरुण, शेतकरी आणि समाजातील वंचितांच्या सेवेसाठी सरकार नेहमीच प्रयत्न करण्याच्या दृष्टीकोनातून एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांची सत्ताधारी आघाडीचे नेते म्हणून निवड करण्यात आली. अशातच तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा नरेंद्र मोदींचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, भाजपाला लोकसभा निवडणुकीत स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही. पण पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएने 543 सदस्यांच्या लोकसभेत 290 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला आहे.

वर्ष 2014 आणि 2019 मध्ये कोणाला देण्यात आले आमंत्रण
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वर्ष 2014 मधील शपथविधी सोहळ्यालासाठी सर्व सार्क राष्ट्राध्यक्षांना आमंत्रण देण्यात आले होते. वर्ष 2019 मध्ये मॉरिशस आणि किर्गिस्तानसह सर्व बिम्सटेक देशांना आमंत्रण पाठवण्यात आले होते. याआधी श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे 21 जुलै, 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठवलेल्या निमंत्रणानंतर भारत दौऱ्यावर आले होते. याशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबतही विक्रमसिंघे यांची बैठक झाली होती.

आणखी वाचा : 

NDA च्या बैठकीत नरेंद्र मोदींची 'नेते' पदी निवड, आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा, राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींची घेतली भेट

Top Stories