सार
अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा येत्या 22 जानेवारीला पार पडणार आहे. तत्पूर्वी हवामान विभागाकडून 22 जानेवारीला अयोध्येतील हवामान कसे असेल याचा अंदाज वर्तवला आहे.
Ayodhya Weather Update : रामललांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्वत्र प्राणप्रतिष्ठेसाठी आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच अयोध्येतील हवामान विभाकडून (IMD) 22 जानेवारीच्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आयएमडीने हवामानाबद्दल अपडेट देत म्हटले की, अयोध्येसह उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडणार आहे.
अयोध्येतील हवामानाचा आयएमडीने लावाय असा अंदाज
भारतीय हवामान विभागाने गुरुवारी (18 जानेवारी) अयोध्येतील हवामानाबद्दलची माहिती वेबपेजच्या माध्यमातून जारी केली आहे. हवामान विभागाने अयोध्येतील तापमानाचा अंदाज वर्तवत म्हटले की, संपूर्ण उत्तर भारताच्या तुलनेत अयोध्येतील तापमान उत्तम राहणार आहे.
रामललांच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमावेळी हलके ऊन पडणार आहे. याशिवाय 22 जानेवारीला अयोध्येत सकाळी तापमान 15 ते 17 डिग्री सेल्सिअस असू शकते. रात्रीच्या वेळी तापमानाचा पारा 6 ते 8 सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतो.
उत्तर भारतातील वातावरण थंड राहणार
आयएमडीनुसार, येणाऱ्या चार-पाच दिवसात उत्तर भारतात धुक पडण्यासह वातावरण थंड राहणार आहे. याशिवाय पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये थंड वारे वाहण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील तापमान
देशाची राजधानी दिल्लीत येणाऱ्या पाच दिवसातील तापमानाचा पार 5 डिग्री सेल्सिअस ते 21 डिग्री सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे.
हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी
हिमाचल आणि उत्तराखंडच्या वरच्या भागात यंदाच्या वर्षातील पहिली बर्फवृष्टी झाली आहे. याशिवाय शिमलामध्ये आज बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा :
20 किलो Parle G बिस्किटांचा वापर करुन साकारण्यात आलेय राम मंदिर, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल