सार

निवडणुकीच्या काळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये एकमेकांवर टीका केली जाते. द्रमुक आणि भाजपमधील भांडण थांबायचं नाव घेत नाहीत.

निवडणुकीच्या काळात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये एकमेकांवर टीका केली जाते. द्रमुक आणि भाजपमधील भांडण थांबायचं नाव घेत नाहीत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये नरेंद्र मोदींना द्रमुकच्या नेत्याने टार्गेट केलं आहे. तो नेता असं म्हणतो की, जर मोदी पुन्हा निवडून आले तर तुम्ही फक्त दही भात आणि सांब खाऊ शकता, तुम्हाला मटण आणि बीफ खाण्यावर बंदी घातली जाईल.

सध्या निवडणूक असल्यामुळे देशभरात एकमेकांवर टीका केली जात आहे. यामध्ये भाजपने कचाथीवू हा मुद्दा उचलून धरल्यामुळे द्रमुक नेते भाजपवर टीका करत आहेत. त्यांनी या मुद्यावरून भाजपला घेराव घातला आहे. द्रमुकच्या नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केल्याची चित्रफीत एक्स प्लॅटफॉमवरून व्हायरल झाली आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदी समर्थक या नेत्यावर टीका करत आहेत. 

तामिळनाडू राज्यामध्ये लोकसभेच्या 39 जागा असून भाजपने येथे विजयासाठी कंबर कसली आहे. के अन्नामलाई यांना पक्षाने ताकद दिल्यानंतर तामिळनाडूमध्ये नरेंद्र मोदींचे दौरे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. 2019 मध्ये द्रमुक पक्षाने 38 जागा जिंकून क्रमांक एकचा पक्ष बनण्याचा मान मिळवला होता, त्यामुळे आता काय होत याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. 
आणखी वाचा - 
पतंजलीला जाहिरातीच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिली चेतावणी, बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण होते हजर
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाने तुरुंगात या गोष्टींसाठी दिलीय परवानगी, जाणून घ्या सविस्तर...